विशेष प्रतिनिधी
दिल्ली : इंधन दरवाढीने शनिवारी सलग तिसऱ्यांदा उच्चांक गाठला आहे. ही वाढ निश्चितच एक विक्रमी वाढ म्हणून नोंदवण्यात येऊ शकते. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे प्रतिलिटर मागे 35 पैशांनी दर वाढवले आहेत असे जाहीर केले आहे. या दरवाढीमुळे सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे. गेल्या तीन आठवड्यांमधील पेट्रोलमधील हे 15 वी तर डिझेल दरातील ही 18 वी दरवाढ आहे.
Nawab malik targets modi over the increased prices of petrol and diesel
या दरवाढीमुळे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदी यांना निशाण्यावर धरले आहे. 2014 मध्ये जेव्हा मोदी यांनी निवडणूक जिंकली होती आणि ये सत्तेत आले होते, त्यावेळी इंधनाचे भाव कमी झाले होते. यावेळी मोदींनी माझ्या नशिबाने इंधनाचे दर कमी होत आहेत असे वक्तव्य केले होते. तुम्हाला तुमचे चांगले नशीब हवे आहे की नको? असे म्हणत मोदींनी विरोधकांना चांगलेच डिवचले देखील होते.
हाच मुद्दा पकडून नवाब मलिक यांनी मोदींवर टीका केली आहे. तुमच्या नशिबानेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले की जनतेच्या नशिबाने वाढलेत? याचं उत्तर मोदींनी द्यावं असं नवाब मलिक म्हणाले आहेत. कोण जास्त बदनशीबी आहे? देशातील जनता की तुम्ही? याचं उत्तर मोदींनी द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
Nawab malik targets modi over the increased prices of petrol and diesel
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे, बारामती, कोल्हापूर, जयपूरसह ७० ठिकाणी छाप्यांमध्ये सापडलेली बेहिशेबी मालमत्ता १८४ कोटींची!!
- चंद्रकांत पाटलांची मोठी ऑफर ; म्हणाले – राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांना पराभूत करा अन् सोन्याचा मुकुट मिळवा
- जी २३ नेत्यांना सोनिया सुनावत असताना #यह दिल मांगे राहुल #YehDilMangeRahul जोरदार ट्विटरवर ट्रेंड
- नवाब मलिक यांचा पुन्हा एनसीबीवर वार, एकापाठोपाठ ट्विट करत समीर वानखेडेंना घेरले, म्हणाले – फ्लेचर पटेल कोण हे NCBने सांगावं!