• Download App
    पक्षांतराच्या वावड्या उठविल्याने नवज्योतसिंग सिध्दू संतप्त, आरोप सिध्द करण्याचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांना आव्हान|Navjyot Singh Sidhu is angry over the allegations of defection. Challenge to Amarinder Singh

    पक्षांतराच्या वावड्या उठविल्याने नवज्योतसिंग सिध्दू संतप्त, आरोप सिध्द करण्याचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांना आव्हान

    पंजाब कॉँग्रेसमधील अंतर्गत कुरबुरी थांबण्यास तयार नाहीत. मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांच्याविरोधात माजी मंत्री आणि क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिध्दू यांनी एल्गार पुकारला आहे. पक्षांतर करण्याचा आरोप अमरिंदर सिंग यांनी केल्याने संतप्त झालेल्या सिध्दूने माझ्यावर लावलेला पक्ष बदलणार असल्याचा आरोप सिद्ध करून दाखवावा, असे आव्हान दिले आहे.Navjyot Singh Sidhu is angry over the allegations of defection. Challenge to Amarinder Singh


    विशेष प्रतिनिधी

    चंडीगढ : पंजाब कॉँग्रेसमधील अंतर्गत कुरबुरी थांबण्यास तयार नाहीत. मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांच्याविरोधात माजी मंत्री आणि क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिध्दू यांनी एल्गार पुकारला आहे.

    पक्षांतर करण्याचा आरोप अमरिंदर सिंग यांनी केल्याने संतप्त झालेल्या सिध्दूने माझ्यावर लावलेला पक्ष बदलणार असल्याचा आरोप सिद्ध करून दाखवावा, असे आव्हान दिले आहे.



    सिद्धू म्हणाले, मी कोणत्याही पदासाठी चर्चा केलेली नाही; परंतु त्यांना अनेकदा मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्याची तयारी दर्शविण्यात आली. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यात ते काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्यासमवेत दिसत आहेत.

    पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने मागील महिन्यात पंजाब पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) कोटकपुरा गोळीकांडाबाबत सादर केलेला चौकशी अहवाल रद्द केला आहे.

    त्यानंतर सिद्धू यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे. पंजाबच्या फरिदकोट येथे धार्मिक ग्रंथाचा अनादर झाल्याच्या विरोधातील निदर्शनांच्या वेळी ही घटना घडली होती.

    दरम्यान, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी सिद्धू यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, ते पूर्णपणे शिस्तभंग करीत आहे. ते आम आदमी पार्टीत जाऊ शकतात. यावर सिद्धू यांनी शनिवारी ट्वीट करून म्हटले आहे की,

    अन्य पक्षांचे नेते हजर असलेल्या कोणत्याही बैठकीला मी हजर असल्याची माहिती द्यावी किंवा मी अन्य पक्षाच्या कोणत्याही नेत्याला भेटलो असल्यास सांगावे. मी कोणाकडेही कोणत्याही पदासाठी आग्रह धरलेला नाही.

    मला फक्त पंजाबची भरभराट पाहिजे. मला मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी अनेकदा सांगण्यात आले; परंतु मी झालो नाही. आता आमच्या पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप केला आहे. वाट पाहूया, असेही सिध्दू यांनी म्हटले आहे.

    सिद्धू यांच्या या टीकेला आता अमरिंदर सिंग यांनी उत्तर दिलं आहे. अमृतसरचे आमदार असलेल्या सिद्धूंनी माज्या विरुद्ध विधानसभा निवडणूक लढवावी. त्यांचं डिपॉझिट जप्त होईल, असं आव्हान अमरिंदर सिंग यांनी दिलं आहे.

    यापूर्वीही अमरिंदरसिंग आणि सिध्दू यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. अमरिंदर सिंग म्हणाले होते की ते (सिद्धू) रोज काही तरी बोलत आहेत. त्यांनी वक्तव्य केलं नाही, असा एक दिवस जात नाही. माझ्यावर टीका करण्याशिवाय त्यांच्याकडं काहीही अजेंडा नाही.

    ते कोणत्या पक्षात आहेत हेच त्यांना माहिती नाही. ते काँग्रेसमध्ये असतील तर शिस्तभंग करत आहेत. त्यांना या प्रकारचे वक्तव्य करण्याची गरज काय? ते बहुधा आम आदमी पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपा त्यांना परत घेणार नाही.

    अकाली दलबाबतही तीच परिस्थिती आहे. ते कुठं जातील? एकतर आमच्या पक्षात राहतील किंवा बाहेर पडतील. अमृतसरचे आमदार असलेल्या सिद्धूंनी माझ्याविरुद्ध विधानसभा निवडणूक लढवावी. त्यांचे डिपॉझिट जप्त होईल.

    Navjyot Singh Sidhu is angry over the allegations of defection. Challenge to Amarinder Singh

    महत्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!