वृत्तसंस्था
लखीमपूर : पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या लखीमपूर दौऱ्यात पीडित शेतकरी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या पत्रकार रमण कश्यप यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तेथेच त्यांनी आपण उपोषणाला बसण्याची घोषणा केली.Navjot Singh Sidhu’s fast and silence in Lakhimpur
लखीमपूर मधल्या हिंसाचारात केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा ट्रेनिंग यांचा मुलगा अमित मिश्रा सामील आहे. तो जोपर्यंत हिंसाचाराच्या तपासात चौकशीला सामोरा जात नाही, तोपर्यंत आपण येथे उपोषण सुरू करणार आहोत आणि इथून पुढे मौनव्रत पाळणार आहोत. त्यामुळे पत्रकारांशी बोलताना येणार नाही, असे नवज्योत सिंग सिद्धू यांनी जाहीर केले.
नवज्योत सिंग सिद्धू लखीमपूर मध्ये ठाण मांडून बसले आहेत. त्याआधी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी येथे येऊन स्वतंत्रपणे पीडित शेतकरी कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांना सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले.
भाजपा सोडून अन्य सर्व पक्षांचे नेते लखीमपूर गावाचे दौरे करत आहेत. पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटत आहेत. परंतु ते एकमेकांची भेट घेण्याचे टाळताना दिसत आहेत. येथे देखील पक्षीय अभिनिवेश मोठ्या प्रमाणावर पुढे येताना दिसतो आहे.
Navjot Singh Sidhu’s fast and silence in Lakhimpur
महत्त्वाच्या बातम्या
- आर्यन खान प्रकणावर रविना टंडन संतापल्या , दिली ‘ही ‘ प्रतिक्रिया
- एअर इंडिया ६८ वर्षांनंतर पुन्हा टाटांची : रतन टाटा म्हणाले ‘वेलकम बॅक’, तब्बल १८ हजार कोटींमध्ये झाला करार
- NCB अधिकाऱ्याने रेल्वेत काढली विद्यार्थिनीची छेड , पोलिसांनी केली अटक
- काँग्रेसच्या स्टार कॅम्पेनर यादीत कन्हैया कुमार, सचिन पायलटसह जी 23 मधील आनंद शर्मांचाही समावेश