कोरोनाविरोधातील लढ्यात वैद्यकीय साधनसामग्री पोहोचविण्यासाठी भारतीय नौदलाने ऑपरेशन समुद्रसेतू-२ हाती घेतले आहे. ४० मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन टँकर आणि सिलिंडरसह नौदलाची तरकश ही युद्धनौका बुधवारी मुंबईत दाखल झाली.Naval Operation Samudrsetu in the fight against Corona
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाविरोधातील लढ्यात वैद्यकीय साधनसामग्री पोहोचविण्यासाठी भारतीय नौदलाने ऑपरेशन समुद्रसेतू-२ हाती घेतले आहे. ४० मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन टँकर आणि सिलिंडरसह नौदलाची तरकश ही युद्धनौका बुधवारी मुंबईत दाखल झाली.
देशात कोरोनाचा कहर वाढल्याने ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला. त्यामुळे सरकारने जगभरातून ऑक्सिजन आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यामध्ये नौदलाने महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.
कोरोनाच्या लढतीत फ्रान्सने भारतासाठी सहकायार्चा हात पुढे केला असून, ऑक्सिजन सॉलिडॅरेटी ब्रिज या मोहिमेची आखणी करण्यात आली आहे. या अंतर्गत दोन महिन्यांत ६०० मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजन भारतात आणला जाणार आहे.
त्यानुसार सोमवारी पहिल्या खेपेत आय.एन.एस. त्रिकंद मधून ४० मे.टन ऑक्सिजन आणण्यात आआला. बुधवारी आय.एन.एस. तरकशमधून साहित्य मुंबईतील नौदलाच्या गोदीत उतरविण्यात आले.
प्रत्येकी २० टन द्रवरूप ऑक्सिजन सह दोन क्रायोजेनिक टँकर, तसेच २३० ऑक्सिजन सिलिंडर बुधवारी नौदलाकडून स्थानिक प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले.