• Download App
    नाटो, युरोपीय महासंघानी घातले राशियासमोर शेपूट; युक्रेनच्या मदतीचा नुसताच आव; ठोस पावले नाहीत । NATO, European Confederation wears tail in front of Russia; Just pretending to help Ukraine; No concrete steps

    नाटो, युरोपीय महासंघानी घातले राशियासमोर शेपूट; युक्रेनच्या मदतीचा नुसताच आव; ठोस पावले नाहीत

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : रशियन युक्रेन युद्धात युक्रेनला सर्व ती मदत करण्याचे आश्वासन देणाऱ्या नाटो आणि युरोपीय महासंघाने रशियासमोर शेपूट घातले आहे. रशियाच्या अण्वस्त्र हल्ल्याच्या धमकीची त्यांनी धास्ती घेतल्याचे स्पष्ट होत आहे. NATO, European Confederation wears tail in front of Russia; Just pretending to help Ukraine; No concrete steps

    रशियाचे राष्ट्रपती आक्रमक आणि लष्करी डावपेच आखण्यात तरबेज आहेत. त्यांच्या आक्रमक कृतीमुळे युक्रेन भोवती पारतंत्र्याचा फास दिवसेंदिवस आवळला जात आहे. एक एक शहरे पडत गेली तरी नाटो आणि युरोपीय महासंघ यांच्यासमोर केवळ पाहत बघण्याशिवाय अन्य पर्याय नाही. रशियाने या संधीचा अचूक फायदा उठवून आक्रमक कारवाई सुरू ठेवली आहे.



    शस्रबळ ज्यांच्याकडे अधिक त्याच्यासमोर कुणाचेही चालत नाही. शत्रूराष्ट्रापेक्षा आपल्याकडे तिप्पट शस्त्रबळ असेल तर शत्रू आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही, हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वाक्य आज तंतोतंत लागू पडत आहे.

    युक्रेनची घोडचूक नडली

    युक्रेनकडे यापूर्वी अण्वस्त्राचा मोठा साठा होता.अण्वस्त्र साठ्यात जगातील तिसरा क्रमांक युक्रेनचा होता. पण, त्यांनी हा साठा रशियाकडे सोपविला आणि अण्वस्त्रमुक्त राष्ट्र म्हणून स्वतःला घोषित केले. याचे दुष्परिणाम युक्रेनला आज भोगावे लागत आहे. आज युक्रेनकडे अण्वस्त्र असती तर रशिया अण्वस्त्र हल्ला करण्याचे इशारे देऊ शकला नसता. तसेच युक्रेनवर हल्ला करताना अनेकदा त्याला विचार करावा असता.

    NATO, European Confederation wears tail in front of Russia; Just pretending to help Ukraine; No concrete steps

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये