विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तुमची स्वप्ने स्थानिक ठेवू नका, त्यांना जागतिक बनवा. पूर्वीच्या काळातही एक-दोनच मोठ्या कंपन्या तयार होत होत्या, पण गेल्या वर्षी आपल्या देशात 42 युनिकॉर्न बनले आहेत. हजारो कोटींच्या या कंपन्या आत्मविश्वासपूर्ण भारताचे वैशिष्ट्य आहेत. आज भारत झपाट्याने युनिकॉर्नचे शतक ( Century of Unicorn) पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारतातील स्टार्टअप्स जगातील इतर देशांमध्ये सहज पोहोचू शकतात. त्यामुळे तुमची स्वप्ने फक्त स्थानिक ठेवू नका तर ती जागतिक बनवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. National startup day will be celebrate on 16 January
Prime minister Narendra Modi’s announcement
मोदी यांनी शनिवारी स्टार्ट-अप्सशी झालेल्या चर्चेदरम्यान मोठी घोषणा केली. यापुढे 16 जानेवारी हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय स्टार्ट-अप डे’ म्हणून साजरा केला जाईल, असे त्यांनी जाहीर केले. मोदी यांनी शनिवारी स्टार्टअप व्यापाऱ्यांशी संवाद साधला आणि त्याच्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली. स्टार्टअपची ही संस्कृती दूरवर पोहोचली पाहिजे, यासाठी दरवर्षी 16 जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मोदी यांनी सांगितले.
मोदी म्हणाले, “लहानपणापासून देशातील विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण गोष्टींकडे आकर्षण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. 9,000 हून अधिक अटल टिंकरिंग लॅब आज मुलांना शाळांमध्ये नाविन्य पूर्ण करण्याची आणि नवीन कल्पनांवर काम करण्याची संधी देत आहेत.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना सांगितले की, नावीन्यपूर्णतेबाबत भारतात सुरू असलेल्या मोहिमेचा परिणाम असा झाला आहे की जागतिक नवोपक्रम निर्देशांकात भारताच्या क्रमवारीतही बरीच सुधारणा झाली आहे. 2015 मध्ये भारत या क्रमवारीत 81 व्या क्रमांकावर होता. आता इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत 46 व्या क्रमांकावर आहे.
National startup day will be celebrate on 16 January Prime minister Narendra Modi’s announcement
महत्त्वाच्या बातम्या
- UP BJP candidate list : भाजपच्या पहिल्या यादीत ४४ ओबीसी, १९ एससी, १० महिला; २० हून अधिक आमदारांची कापली तिकिटे, वाचा सविस्तर..
- National Start-up Day : देशात दरवर्षी 16 जानेवारीला साजरा होणार ‘नॅशनल स्टार्ट-अप डे’, पंतप्रधान मोदी म्हणाले – जगभरात भारताचा डंका!
- BSP Candidates List : मायावतींनी जाहीर केली पहिल्या टप्प्यातील बसपच्या उमेदवारांची यादी, वाचा सविस्तर..
- शिवसेना एका गुबगूबीत खुर्चीपुरती मर्यादित; संपत चालल्याची चंद्रकांत पाटील यांची टीका
- BJP Candidates List : यूपी निवडणुकीसाठी भाजपकडून १०७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, मुख्यमंत्री योगी गोरखपूरमधून लढणार, ६३ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी