विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: गौतम बुद्ध नगरचे डि.एम व पॅरा बॅडमिंटन खेळाडू सुहास एलवाय (Suhas LY) यांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे हस्ते नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनामधे अर्जुन अॅवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
National Sports Awards 2021 , Paralympic Medal winners honoured by President Ram Nath Kovind
ही अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे. कारण इतर खेळाडूंचा सन्मान राष्ट्रीय स्तरावर केला गेला आहे आणि त्यांना महत्व दिले गेले आहे. परंतु पॅरालिम्पिकमधील खेळाडूना देखील सन्मान मिळणे आवश्यक होते.
राष्ट्रपती भवनात पार पडला नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड 2021 सोहळा
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी पॅरालिंपिक सुवर्ण पदक विजेते प्रमोद भगत- (बॅडमिंटन) यांनाही मेजर ध्यानचंद खेलरत्न अॅवार्ड २०२१ प्रदान केले आहे. त्याचबरोबरीने अवनी लेखारा- (शुटिंग), सुमीत अंतील- (अॅथलेटिक्स), कृष्णा नागर- (बॅडमिंटन), मनीश नारवाल- (शुटिंग) या पॅरालिम्पिकमधील विजेत्यांनासुद्धा खेलरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप २५ लाख ₹, सन्मानचिन्ह व मेडल असे आहे.
प्रमोद भगतने एएनआय सोबत बोलताना ह्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. सर्व प्रथम आमचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान केला जातोय आणि ही गोष्ट अतिशय प्रेरणा देणारी आहे. ह्या प्रेरणेच्या जोरावर आम्ही भविष्यत आणखी मेडल जिंकू. असे प्रमोद भगत म्हणले होते.
National Sports Awards 2021 , Paralympic Medal winners honoured by President Ram Nath Kovind
महत्त्वाच्या बातम्या
- मला गुजरातीपेक्षा हिंदी भाषा जास्त आवडते, आपल्याला आपली अधिकृत भाषा मजबूत करण्याची गरज आहे – अमित शहा
- MALIK VS WANKHEDE : …त्या कागदपत्रात नंतर अक्षरे घुसडल्याचे साध्या डोळ्यांनाही दिसतं ; नवाब मलिकांनी सोशल केलेल्या वानखेडेंच्या जन्मदाखल्यावर हायकोर्टाची फटकार
- अमरावती शहरात कलम १४४ लागू , जिल्हाधिकारी पवणीत कौर यांनी दिले जमावबंदीचे आदेश
- Delhi Lockdown:असह्य दिल्ली-परेशान दिल्लीकर! दिल्लीमध्ये प्रदूषणाचा लॉकडाऊन ! नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन…