• Download App
    श्रीनगर आणि दिल्ली हादरवण्याचा कट फसला, गाझीपूर मंडीत संशयास्पद बॅगेत सापडलेला आयईडी सुरक्षा दलांकडून निष्क्रिय National Security Guard (NSG) carries out a controlled explosion of the IED found at East Delhi's Ghazipur Flower Market%

    मोठी बातमी : श्रीनगर आणि दिल्ली हादरवण्याचा कट फसला, गाझीपूर मंडीत संशयास्पद बॅगेत सापडलेला आयईडी सुरक्षा दलांकडून निष्क्रिय

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : राजधानी दिल्ली आणि श्रीनगरला हादरवण्याचा दहशतवाद्यांचा मोठा कट फसला आहे. आज पूर्व दिल्लीतील गाझीपूरच्या फूल मार्केटमध्ये एका बेवारस पिशवीतून एक आयईडी सापडला. त्यानंतर लगेचच दिल्ली पोलिसांनी बॉम्ब निकामी करणारे पथक फूल मंडीत पाठवले. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने स्फोटक कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याचवेळी श्रीनगरमध्येही ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे.National Security Guard (NSG) carries out a controlled explosion of the IED found at East Delhi’s Ghazipur Flower Market

    सकाळी 10.20 वाजता मिळाली बॉम्बची माहिती

    बेवारस बॅगेत आयईडी मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह एनएसजीही घटनास्थळी पोहोचले. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, सकाळी 10.20 वाजता पीसीआर कॉल आला होता. यानंतर खबरदारी म्हणून सर्व SOP चे पालन करण्यात आले. पोलिसांनी तत्काळ अग्निशमन दल, बॉम्बशोधक पथक आणि एनएसजीला माहिती दिली.

    8 फूट खोल खड्ड्यात पुरला आयईडी

    यानंतर बॉम्बशोधक पथकाने हा आयईडी भाजी मंडईच्या आतील मोकळ्या मैदानात 8 फूट खोल खड्ड्यात पुरला. यावेळी स्फोटाचा आवाजही ऐकू आला, मात्र जीवित व वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. एनएसजीच्या पथकाने ज्या ठिकाणी ही कारवाई केली त्या ठिकाणची संपूर्ण नाकाबंदी करण्यात आली होती.

    श्रीनगर शहरातील ख्वाजा बाजार येथेही ग्रेनेड सापडले

    त्याच वेळी, श्रीनगरमध्ये, शहरातील ख्वाजा बाजार चौकात एका संशयास्पद पिशवीत गुंडाळलेल्या कुकरमध्ये बॉम्ब शोधक पथकाने ग्रेनेड निकामी केले. यादरम्यान वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती, जी नंतर पूर्ववत करण्यात आली. मात्र, ही बॅग कुठून आली, त्याचा तपास सुरू आहे.

    National Security Guard (NSG) carries out a controlled explosion of the IED found at East Delhi’s Ghazipur Flower Market

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार