वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मुंबईत 30 वर्षीय साकीनाका बलात्कार पीडितेचा शनिवारी मृत्यू झाला. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचाराच्या तिसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. या भयानक गुन्ह्याची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली असून आतापर्यंत फक्त एकाच आरोपीला आतापर्यंत अटक झाल्याबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राज्य सरकारची कारवाई अतिशय संथ गतीने चालू असल्याबद्दल महिला आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. National Commission for Women (NCW) has taken suo moto. If there isn’t any development in matter until this evening
राष्ट्रीय महिला आयोग या भयानक गुन्ह्याची स्वतंत्र चौकशी करणार असून पीडितेच्या परिवाला महिला आयोग सर्व प्रकारची मदत करणार आहे. रेखा शर्मा यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
9 सप्टेंबर रोजी साकीनाका परिसरातील खैरानी रोडवर बलात्कारानंतर महिला बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. नराधमांनी बलात्कारानंतर पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घातला होता. अत्यंत गंभीर अवस्थेत पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमी अवस्थेत तिच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहून गेले होते.
या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला, ज्याच्या आधारे आरोपीला पोलिसांनी अटक केली. ही घटना रात्री उशिरा 2.30 ते 3 च्या दरम्यान घडली. व्हिडिओमध्ये बलात्कारानंतर आरोपी महिलेला रॉडने जखमी करताना दिसत आहे. पीडितेला टेम्पोमध्ये टाकून आरोपी तेथून फरार झाला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले की, मी स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे आणि प्रत्येक क्षणाचे अपडेट घेत असल्याचे ते म्हणाले. परंतु, साकीनाका परिसरातील या घटनेने दिल्लीतील निर्भया प्रकरणाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. याची दखल महिला आयोगाने घेतली आहे.
पोलीस नियंत्रण कक्षाला शुक्रवारी पहाटे फोन आला की, खैराणी रोडवर एक पुरुष एका महिलेला मारहाण करत आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले, तेव्हा पीडिता रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळली. ताबडतोब तिला महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले.
हा गुन्हा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोच्या आत घडली. अधिकाऱ्याने सांगितले की, वाहनाच्या आत रक्ताचे डागदेखील सापडले आहेत. पोलिसांनी कारवाई करत आरोपी चौहानला भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 307 (खुनाचा प्रयत्न) आणि 376 (बलात्कार) अंतर्गत अटक करण्यात आली आणि पुढील तपास सुरू आहे.
रॉड घातल्याने आतडे बाहेर आले होते
पीडित महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली, पण तिला वाचवण्यात यश आले नाही. डॉक्टरांनी सांगितले आहे की, रॉड आत घातल्यामुळे महिलेचे आतडे बाहेर आले होते. अखेर तिची प्राणज्योत मालवली. या अमानुष घटनेमुळे राज्यभरात संताप उसळला आहे.
National Commission for Women (NCW) has taken suo moto. If there isn’t any development in matter until this evening
महत्त्वाच्या बातम्या
- आकाशावर लक्ष ठेवण्यासाठी हवाई दलाला मिळणार सहा विमाने, अकरा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर
- भाषिक कट्टरता धोकादायक, हिंदी अधिकृत भाषा नसणाऱ्या राज्यांशी केंद्राने साधावा इंग्रजीमध्ये संवाद, मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश
- लस न घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर पंजाब सरकारचा बडगा, 15 सप्टेंबरनंतर सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश
- वर्क फ्रॉम होम नको रे बाप्पा..! तातडीने वर्क फ्रॉम ऑफिस सुरु न केल्यास लग्न टिकणारच नसल्याने कर्मचार्याच्या पत्नीचे उद्योगपतीला साकडे