वृत्तसंस्था
कैरो : देशांतर्गत राजकारणात मोदी विरोधातले 15 विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांना पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करत असले तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना एकापाठोपाठ एक सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त होत आहेत.Narendra Modi with Order of the Nile award Egypt’s highest state honour in Cairo.
इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कैरो येथे इजिप्तचा सर्वोच्च नागरी सन्मान “ऑर्डर ऑफ द नाईल” पुरस्कार एका शानदार समारंभात प्रदान केला. गेल्या 9 वर्षात जगातील विविध देशांनी पंतप्रधान मोदींना प्रदान केलेला हा 13 वा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
एकीकडे देशातले मोदी विरोधक 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींचा पराभव करण्याच्या कल्पनेने पछाडले आहेत. त्यासाठी त्यांनी विरोधी ऐक्याचा प्रयत्न चालवला आहे. देशात लोकशाही नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. मुस्लिम असुरक्षित आहेत. अल्पसंख्यांक, दलित यांच्यावर अत्याचार होत आहेत, अशी वातावरण निर्मिती करण्यात विरोधकांची चढाओढ लागली आहे. पण त्याच वेळी मोदींना मात्र एकापाठोपाठ एक असे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे सर्वोच्च नागरी सन्मान मिळत आहेत. “ऑर्डर ऑफ द नाईल” हा त्यांना मिळालेला 13 वा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
Narendra Modi with Order of the Nile award Egypt’s highest state honour in Cairo.
महत्वाच्या बातम्या