• Download App
    Narendra Giri Suicide Case: महंत नरेंद्र गिरी यांना व्हिडिओवरून ब्लॅकमेल केले जात होते, सपा सरकारमध्ये मंत्री असलेल्या नेत्यावर संशय । narendra giri suicide case, blackmailed by cd video, samajwadi party leader suspected, police into probe

    Narendra Giri Suicide Case: महंत नरेंद्र गिरी यांना व्हिडिओवरून ब्लॅकमेल केले जात होते, सपा सरकारमध्ये मंत्री असलेल्या नेत्यावर संशय

    Narendra Giri Suicide Case : उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी केली जात आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. आता याबाबत अनेक नवीन खुलासे होत आहेत. ताज्या माहितीनुसार, महंत नरेंद्र गिरी यांना व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल केले जात होते. narendra giri suicide case, blackmailed by cd video, samajwadi party leader suspected, police into probe


    विशेष प्रतिनिधी

    प्रयागराज : उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी केली जात आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. आता याबाबत अनेक नवीन खुलासे होत आहेत. ताज्या माहितीनुसार, महंत नरेंद्र गिरी यांना व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल केले जात होते.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महंत नरेंद्र गिरी यांना ब्लॅकमेल करण्यासाठी एका सीडीचा वापर केला जात होता. ब्लॅकमेलिंगच्या या प्रकरणात समाजवादी पक्षाच्या सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या व्यक्तीचीही चौकशी सुरू आहे.

    ज्या नेत्याबद्दल बोलले जात आहे, ते अनेकदा बाघंब्री मठात नरेंद्र गिरी यांना भेटायला येत असत. एवढेच नव्हे तर या संपूर्ण प्रकरणात अटकेत असलेले शिष्य आनंद गिरी हेही माजी राज्यमंत्र्यांच्या जवळचे होते.

    प्रयागराज पोलिसांना कॉल डिटेल्सच्या मदतीने हे सर्व महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत आणि आता हे समाजवादी पक्षाचे मंत्रीही पोलिसांच्या रडारवर आले आहेत. ताज्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आता पुढील तपास सुरू केला आहे.

    पोलिसांनी एफआयआर नोंदवला

    उल्लेखनीय म्हणजे, प्रयागराज पोलिसांनी नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूबाबत आधीच एफआयआर नोंदवला आहे. हा एफआयआर कलम 306 अंतर्गत नोंदवण्यात आला आहे, ज्यात आनंद गिरीचेही नाव आहे. आनंद गिरीवर महंत नरेंद्र गिरी यांचा मानसिक छळ केल्याचा आरोप आहे.

    महंत नरेंद्र गिरी यांनी त्यांच्या सुसाइड नोटमध्ये आनंद गिरी यांचाही उल्लेख केला आहे. याशिवाय इतर दोन पुजाऱ्यांना प्रयागराजमधून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस सुरुवातीला या प्रकरणाचा संबंध आत्महत्येशी जोडत आहे, परंतु अंतिम अहवाल सर्व तपासानंतरच दिला जाईल.

    सुसाईड नोटवर प्रश्नचिन्ह

    सोमवारी संध्याकाळी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचे निधन झाले. संध्याकाळी पोलिसांना माहिती मिळाली, त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलीस अजूनही सर्व माहिती गोळा करण्यात व्यग्र आहेत.

    महंत नरेंद्र गिरी यांच्या खोलीतून सापडलेल्या सुसाईड नोटवरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नरेंद्र गिरी नीट लिहू शकत नाहीत, असा आनंद गिरी यांचा दावा आहे, तर नरेंद्र गिरी यांचे आणखी एक शिष्य निर्भय द्विवेदी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, महंत जी लिहू शकत होते. निर्भय यांच्या म्हणण्यानुसार, नरेंद्र गिरी सोमवारी कोणाची तरी वाट पाहत होते, कोणीतरी त्यांना भेटायला येणार होते. सुसाईड नोटव्यतिरिक्त नरेंद्र गिरी यांनी एक व्हिडिओदेखील रेकॉर्ड केला आहे, तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे.

    narendra giri suicide case, blackmailed by cd video, samajwadi party leader suspected, police into probe

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले