Nandigram Assembly Elections Result : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींचा पक्ष तृणमूल काँग्रेसच्या पारड्यात बहुमताचे दान पडले आहे. परंतु, त्यांना स्वत:च्या मतदारसंघात पराभवाची चव चाखावी लागली आहे. दरम्यान, काही वेळापूर्वी वृत्तसंस्था एएनआयने जाहीर केले होते की, ममता बॅनर्जींनी 1200 मतांनी भाजपच्या सुवेंदु अधिकारींचा पराभव केला आहे, परंतु नंतर मतमोजणीत झालेल्या बदलामुळे आता सुवेंदू अधिकारीच विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आपला हा पराभव ममता बॅनर्जी यांनीही मान्य केला आहे. Nandigram Assembly Elections Results : Big twist in Nandigram results, Read how Suvendu Adhikari defeated Mamata Banerjee
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींचा पक्ष तृणमूल काँग्रेसच्या पारड्यात बहुमताचे दान पडले आहे. परंतु, त्यांना स्वत:च्या मतदारसंघात पराभवाची चव चाखावी लागली आहे. दरम्यान, काही वेळापूर्वी वृत्तसंस्था एएनआयने जाहीर केले होते की, ममता बॅनर्जींनी 1200 मतांनी भाजपच्या सुवेंदु अधिकारींचा पराभव केला आहे, परंतु नंतर मतमोजणीत झालेल्या बदलामुळे आता सुवेंदू अधिकारीच विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आपला हा पराभव ममता बॅनर्जी यांनीही मान्य केला आहे.
नंदीग्राम मतदारसंघात सुरुवातीपासूनच ममता दीदींना सुवेंदुंनी कडवे आव्हान दिले होते. नंदिग्राम मतदारसंघ अधिकारी कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. अखेरच्या फेरीपर्यंत सुवेंदू अधिकारी आणि ममता बॅनर्जी यांच्यातील लढाई खूपच रंजक होती. कधी ममता बॅनर्जी पुढे जात होत्या, तर कधी सुवेन्दू अधिकारी आघाडीवर जात होते. 4.25 वाजता तर वृत्तसंस्थेने ममतांनी सुवेंदूंचा 1200 मतांनी पराभव केल्याची बातमीही दिली होती. परंतु नंतर चित्र पुन्हा बदलले. एवढेच नाही, तर ममतांनी आपला पराभव कबूल करूनही तृणमूल काँग्रेसने ट्विट केलंय की, अजूनही मतमोजणी सुरू आहे, त्यामुळे आताच कोणतेही अंदाज बांधू नका.
एएनआय या वृत्तसंस्थेने याआधी केलेले ममता बॅनर्जींच्या विजयाचे ट्विट
एएनआयचे दुसरे ट्वीट, ज्यात ममतांनी आपला पराभव मान्य केला आहे.
निकालात मोठा ट्विस्ट
वास्तविक, मतमोजणीच्या अनेक फेऱ्या असतात, काहींची फेरमोजणीही होते. नंदिग्रामसारख्या हॉटसीटवर अत्यंत चुरशीची लढत असल्याने व विजय-पराभवातील फरक अत्यंत कमी असल्याने निकाल बदलण्याची शक्यता आहे. यामुळेच आधी वृत्तसंस्थेने घाईघाईने दिलेले सुवेंदू अधिकारींच्या 1200 मतांनी पराभवाचे वृत्त चुकीचे ठरले. यानंतर आताच्या अपडेटनुसार ममतांचा 1953 मतांनी पराभव झाला आहे.
पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदीग्राम विधानसभा जागा एक दशकापेक्षा अधिक काळापासून टीएमसीच्या ताब्यात आहे. 2016 मध्ये नंदीग्राममध्ये एकूण 87 टक्के मतदान झाले. 2016 मध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या सुवेंदू अधिकारी यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अब्दुल कबीर शेख यांचा 81,230 मतांच्या फरकाने पराभव केला होता.
नंदीग्राम मतदारसंघात हे उमेदवार होते रिंगणात
या निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून 8 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये भाजपतर्फे सुवेंदू अधिकारी, तृणमूलकडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सीपीआयएमच्या उमेदवार मीनाक्षी मुखर्जी, सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडियाचे (कम्युनिस्ट) मनोज कुमार दास आणि अपक्षांमध्ये दीपककुमार गायेन, सुब्रत बोस, एसके सद्दाम हुसेन आणि स्वपन पुरुआ यांचा समावेश होता.
Nandigram Assembly Elections Results : Big twist in Nandigram results, Read how Suvendu Adhikari defeated Mamata Banerjee
महत्त्वाच्या बातम्या
- पंढरपूरकरांनी केला “करेक्ट कार्यक्रम”; देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्रवादीवर निशाणा
- West bengal assembly elections 2021 reactions : मोठ्या लढाईसाठी काही त्याग करावा लागतो… मी नंदीग्राममध्ये लढले… मी जनतेचा कौल मान्य करते; ममतांचा पराभवावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
- Tamil nadu Assembly Election 2021 Result Analyses : सरकारविरोधातील रोषामुळे द्रमुकला यशप्राप्ती; स्टॅलिन यांच्या नेतृत्वावर जनतेचा पुन्हा विश्वास
- गड आला, पण सिंह गेला.. : बंगाल एकहाती जिंकणाऱ्या ममता बॅनर्जींचा नंदीग्रामात पराभव!
- Belgaum Bypoll Result Live : बेळगावात पुन्हा कमळ फुललं ; भाजपच्या मंगला अंगडी यांचा विजय