विशेष प्रतिनिधी
गुरुग्राम: गुरुग्राम येथे सार्वजनिक ठिकाणी नमाज करण्याबाबत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यानी वक्तव्य केले आहे. काही लोकांसाठी नमाज हा विषय केवळ ताकद दाखवण्यासाठी आहे असे ते म्हणाले. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी नमाज केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, नमाज पठण केले पाहिजे पण काही लोक याला ताकद दाखवणे मानतात. ज्यांना असे नमाज पठण करावयचे असेल त्यांनी प्रशासनाशी चर्चा करणे आवश्यक आहे. कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सर्व धर्मांसाठी नियम करण्यात आले आहेत.
Namaz should not be to show strength – Haryana Chief Minister
नमाज पठण करण्यास प्रत्येक जण मोकळा आहे. पण ते नियुक्त ठिकाणी करण्यात यावे. विविध धर्माचे लोक याबाबत स्थानिक प्रशासनाशी चर्चा करू शकतात असे मुख्यमंत्री म्हणाले. पतौडीच्या घटनेबद्दल त्यांनी वक्तव्य केले की, ख्रिसमसच्या उत्सवात व्यत्यय आणणे ही दुर्दैवी घटना आहे. अशा घटनांचे समर्थन करीत नाही. अशा प्रकारे कार्यक्रमात व्यत्यय आणणे योग्य नाही असे खट्टर म्हणाले.
हरियाणाचे मुख्यमंत्री बदलले जाणार? खट्टर यांच्यानंतर कोण बनणार हरियाणाचे मुख्यमंत्री?
गुरुग्राम जिल्हा प्रशासनाने ३७ पैकी आठ नियुक्त ठिकाणी नमाज पठण करण्यावर बंदी घातली आहे. नमाज पठण करण्यास मशिदी आणि इदगाह असून सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करणे आवश्यक नाही असे सर्वसामान्यांना वाटते.
शेतकरी आंदोलनाबाबत मुख्यमंत्री बोलत होते. या आंदोलनामागे राजकीय महत्त्वाकांक्षा असलेले लोक होते. ते स्वतः ला शेतकरी नेता म्हणत असले तरी ते राजकीय महत्त्वाकांक्षा असणारे आहेत.
Namaz should not be to show strength – Haryana Chief Minister
महत्त्वाच्या बातम्या
- GST Council Meeting : नववर्षापूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा, कपड्यांवर जीएसटीचे दर तूर्तास वाढणार नाहीत
- 2021ची वर्षाअखेर गाजतेय जुमला अवॉर्ड सेरिमनीने!!; And the Award goes to जुमला फकीर…!!
- मोठी बातमी : रशियाचा स्पाय सॅटेलाइट अवकाशात झाला अनियंत्रित, लवकरच पृथ्वीवर आदळण्याची शक्यता, शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा
- Income Tax Return : ITRची मुदत वाढवण्यास अर्थमंत्रालयाचा नकार, कोणत्याही परिस्थितीत 12 वाजेपर्यंत दाखल करा!