• Download App
    नफरतीच्या जमिनीवर राम मंदिराचे निर्माण; लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते जगदानंद सिंहांचे बिघडले बोल!! Nafrat Ki Zameen RJD leader's remark on Ram Mandir sparks row. BJP hits back

    नफरतीच्या जमिनीवर राम मंदिराचे निर्माण; लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते जगदानंद सिंहांचे बिघडले बोल!!

    वृत्तसंस्था

    पाटणा : अनेक शतकांच्या संघर्षानंतर अयोध्येत रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिर निर्माण होत असताना संपूर्ण हिंदू समाजाला आनंद आणि अभिमान वाटतो आहे. पण त्या आनंदात बिब्बा घालण्याचे काम अनेक राजकीय पक्षांचे नेते करत आहेत यापैकीच एक नेते आहेत, बिहार मधल्या लालूप्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह. Nafrat Ki Zameen RJD leader’s remark on Ram Mandir sparks row. BJP hits back

    जगदानंद सिंह यांनी एक वादग्रस्त वक्तव्य करून संपूर्ण देशातल्या रामभक्तांचा रोष ओढवून घेतला आहे. नफरतीच्या जमिनीवर राम मंदिर निर्माण होत आहे. आता राम सर्वसामान्य लोकांमध्ये, गरिबांमध्ये अयोध्येतले राम राहिले नाहीत. ते शबरीची बोरे खाणारे राम राहिले नाहीत, तर पत्थरांमध्ये कैदेत राहणारे राम शिल्लक राहणार आहेत, असे वक्तव्य जगदानंद सिंह यांनी केले आहे.

    करोडो भारतीयांच्या हृदयातून राम काढून तो दगड विटांच्या मंदिरात बंदिस्त केला जात आहे. पण आम्ही भारतीय हे रामाचे लोक आहोत. जय श्रीराम वाले लोक नाही, असे उद्गारही जगदंब सिंह यांनी काढले आहेत.

    अयोध्येतील भव्य राम मंदिर हे काट्यासारखे जगदानंद सिंह आणि अनेक लिबरल पक्षाच्या नेत्यांच्या हृदयात घुसले आहे आणि त्यामुळेच त्यांचे बिघडलेले बोल असे वेळोवेळी समोर येत आहेत.

    भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी ट्विट करून जगदानंद सिंह यांना प्रत्युत्तर दिले आहे. हुसेन दलवाई ते जगदानंद सिंह : यह कोई संयोग नही, यह वोट बँक का प्रयोग है, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

    Nafrat Ki Zameen RJD leader’s remark on Ram Mandir sparks row. BJP hits back

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची