• Download App
    अभिनेता सुशांतसिंह राजपूतची हत्या की आत्महत्या, वर्ष झाले तरी सीबीआय काही सांगेना - मलिक|Nabab Malik targets on Sushant Issue

    अभिनेता सुशांतसिंह राजपूतची हत्या की आत्महत्या, वर्ष झाले तरी सीबीआय काही सांगेना – मलिक

     

    मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूतची हत्या की आत्महत्या होती हे सीबीआय एक वर्ष झाले तरी सिद्ध करु शकलेली नाही. मात्र, या प्रकरणावरुन महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान करण्यात आल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.Nabab Malik targets on Sushant Issue

    एखादी घटना ज्या राज्यात घडते त्या राज्याकडेच तपास राहतो. मात्र सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणात बिहार सरकारने त्यांच्या हद्दीत हत्येचा गुन्हा दाखल करुन प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी दिले होते. सीबीआय एक वर्ष या प्रकरणाचा तपास करतेय आणि अजून ही हत्या की आत्महत्या हे सांगू शकलेली नाही असेही नवाब मलिक म्हणाले.



    बिहार निवडणुकीत राजकीय फायदा उठवण्यासाठीच सुशांतसिंग राजपूतचे प्रकरण रंगवण्यात आल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला.सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास सीबीआयने ताब्यात घेऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, अजूनही यामध्ये सीबीआयने कोणताच खुलासा केला नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

    Nabab Malik targets on Sushant Issue

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे