Saturday, 10 May 2025
  • Download App
    लग्न लावले पण नव्या नवऱ्याची नसबंदी केली, कॉँग्रेसने माझी अशीच केली अवस्था, हार्दिक पटेल यांची पक्षावर टीका|My position in Congress is that of a newly married groom who has been made to undergo nasbandi,Hardik Patel lashes out at Cong

    लग्न लावले पण नव्या नवऱ्याची नसबंदी केली, कॉँग्रेसने माझी अशीच केली अवस्था, हार्दिक पटेल यांची पक्षावर टीका

    विशेष प्रतिनिधी

    अहमदाबाद : लग्न लावले पण नव्या नवऱ्या ची नसबंदी केली अशीच माझी अवस्था कॉँग्रेसने केली आहे. पक्षाकडून माझ्याकडे पूर्ण दूर्लक्ष केले जात आहे. कोणत्याही बैठकांना बोलावले जात नाही अशा शब्दांत पाटीदार नेते आणि गुजरात कॉँग्रेसचे अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी पक्षावर टीका केली आहे.My position in Congress is that of a newly married groom who has been made to undergo nasbandi,Hardik Patel lashes out at Cong

    2015 च्या एका खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यावर हार्दिक पटेल म्हणाले, प्रदेशा कॉँग्रेसच्या कोणत्याही बैठकीला मला आमंत्रित केले जात नाही. कोणत्याही निर्णयाबाबत माझा सल्ला घेतला जात नाही. मग या पदाचा उपयोगच काय? नुकतेच पक्षाने 75 नवीन सरचिटणीस आणि 25 नवीन उपाध्यक्षांची घोषणा केली. मात्र, यामध्ये मला विचारले देखील नाही.



    खोडलधाम ट्रस्टचे अध्यक्ष आणि शक्तिशाली पाटीदार नेते नरेश पटेल यांच्याबाबत निर्णय घेण्यास उशीर का करत आहात असा सवालही हार्दिक यांनी पक्षनेतृत्वाला केला आहे. त्यांना अपाल्याकडे घेण्यासाठी सर्वच पक्ष इच्छुक आहेत. मात्र, कॉँग्रेस त्याबाबत निर्णय घेत नाही. हा संपूर्ण पाटीदार समाजाचा अपमान असल्याचेही ते म्हणाले.

    गेल्या निवडणुकीपूर्वी गुजरात सरकारच्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व केल्यानंतर राहूल गांधी यांनी 2020 मध्ये हार्दिक पटेल यांची प्रदेश कॉँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, आपल्याला महत्व दिले जात नाही, असे पटेल यांचे म्हणणे आहे.

    पाटीदार आंदोलनामुळे 2015 च्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि 2017 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने चांगली कामगिरी केली होती. 2017 मध्ये 182 सदस्यांच्या सभागृहात काँग्रेसने 77 जागा जिंकल्या होत्या. पण त्यानंतर काय झालं? असा सवाल करत हार्दिक पटेल म्हणाले, काँग्रेसमधीलच अनेकांना वाटते की पक्षाने माझा चांगला उपयोग करून घेतला नाही. पक्षात अनेकांना आपल्यापासून लोकांना धोका आहे असे वाटू शकते.

    My position in Congress is that of a newly married groom who has been made to undergo nasbandi,Hardik Patel lashes out at Cong

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    BSF : बीएसएफने पाकिस्तानचे अनेक दहशतवादी लाँच पॅड केले उद्ध्वस्त

    Operation sindoor : सियालकोट, चकलाला यांच्यासह 7 पाकिस्तानी हवाई आणि लष्करी तळांवर भारताचे हल्ले; ब्राह्मोस आणि S400 सिस्टीम उद्ध्वस्त केल्याचे पाकिस्तानचे दावे खोटे!!

    Pakistani terrorists : BSF ने 7 पाकिस्तानी दहशतवाद्यांना केले ठार; S400-आकाशने पाकिस्तानी ड्रोन नष्ट केले