• Download App
    माझे आदर्श नथुराम गोडसे म्हणणारा विद्यार्थी जिंकला वाद-विवाद स्पर्धा|My ideal Nathuram Godse , student won the debate competition

    माझे आदर्श नथुराम गोडसे म्हणणारा विद्यार्थी जिंकला वाद-विवाद स्पर्धा

    विशेष प्रतिनिधी

    गांधीनगर : माझे आदर्श नथुराम गोडसे असे म्हणणारा विद्यार्थी गुजरातमध्ये वादविवाद स्पर्धा जिंकला आहे. वलसाडच्या एका खासगी शाळेत वाद-विवाद स्पर्धेत मुलांसाठी तीन विषय देण्यात आले होते. यातील एक विषय ‘माझे आदर्श नथुराम गोडसे’ ठेवण्यात आला होता.My ideal Nathuram Godse , student won the debate competition

    स्पर्धेत पहिला क्रमांक जिंकणारा विद्यार्थी महात्मा गांधीच्या विरोधात आणि गोडसेंच्या समर्थनार्थ बोलला आणि गोडसे आदर्श हिरो असल्याचंही म्हणाला. यानंतर गदारोळ उठला असून कारवाईची मागणी केली जात आहे.. यामध्ये 5वी ते 8वी पर्यंतच्या 7 ते 12 वयोगटातील मुलांसाठी हा विषय स्थानिक पातळीवरील शासकीय अधिकाºयांनी निवडला असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.



    या प्रकरणात कुसुम विद्यालयाच्या संचालिका अर्चनाबेन देसाईने सांगितलं की, ही स्पर्धा बाल प्रतिभा शोध कार्यक्रमाअंतर्गत आयोजित केली होती. स्पर्धेची संपूर्ण तयारी सरकारी जिल्हा खेळ कार्यालयाने तयार केली होती. या स्पधेर्साठी आमच्या शाळेने केवळ जागा दिली आणि वलसाडमधील जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या आदेशाचं पालन केलं. स्पर्धा सुरू होण्यापर्यंत आम्हाला या विषयांबद्दल माहिती नव्हतं.

    My ideal Nathuram Godse , student won the debate competition

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    बैल गेला, झोपा केला; जनसुरक्षा विधेयक संमत झाल्यानंतर माओवाद्यांच्या नादी लागून काँग्रेसने self goal करून घेतला!!

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न