• Download App
    "माझे मार्गदर्शक, माझे हिरो " अदर पुनावाला यांनी वडीलांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल व्यक्त केला आनंद । "My guide, my hero" Adar Punawala expressed happiness over his father's Padma Bhushan award

    “माझे मार्गदर्शक, माझे हिरो ” अदर पुनावाला यांनी वडीलांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल व्यक्त केला आनंद

    सर्व १२८ पुरस्कार विजेते हे खरोखरच पुरस्कारासाठी पात्र आहेत, असा उल्लेखही त्यांनी ट्विटमध्ये केला आहे. “My guide, my hero” Adar Punawala expressed happiness over his father’s Padma Bhushan award


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून १२८ पद्म पुरस्कारांची घोषणा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली. त्यात राज्यातील दहा जणांचा समावेश आहे.दरम्यान ‘पूनावाला उद्योग समूहा’चे अध्यक्ष सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

    दरम्यान अदर पूनावाला म्हणजे सायरस पूनावाला यांचा मुलगा यांनी स्वत:च्या बालपणीचा एक फोटो पोस्ट करत आपल्या भावाना व्यक्त केल्या आहेत.तसेच सर्व १२८ पुरस्कार विजेते हे खरोखरच पुरस्कारासाठी पात्र आहेत, असा उल्लेखही त्यांनी ट्विटमध्ये केला आहे.

    अदर पुनावाला ट्विटरवरुन आपल्या भावाना व्यक्त करत म्हणाले की , ”या वर्षी पद्म पुरस्कार मिळवणाऱ्या सर्व व्यक्तींचं मी मनापासून अभिनंदन करतो.मी भारत सरकारचे आभार मानू इच्छितो. त्यांनी माझे मार्गदर्शक, माझे हिरो, माझे वडील डॉक्टर सायरस पूनावाला यांच्या कामाची दखल घेतली,’ असं अदर पूनावाला म्हणाले आहेत.

    तसेच या ट्विटसोबत अदर पूनावाला यांनी एक जुना फोटो ट्विट केला आहे. यामध्ये अगदीच एक दीड वर्षांचे असून विलू सायरस पूनावाला यांच्या कुशीत असणारा चिमुकला मुलगाच अदर पुनावाला आहेत.

    “My guide, my hero” Adar Punawala expressed happiness over his father’s Padma Bhushan award

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही