• Download App
    जम्मू कश्मीर मध्ये दुसरा धक्का; काँग्रेस मधले माझे संबंध संपुष्टात My connection with the Congress ends; Senior leader Dr. Statement by Karan Singh

    जम्मू कश्मीर मध्ये दुसरा धक्का; काँग्रेस मधले माझे संबंध संपुष्टात; वरिष्ठ नेते डॉ. करण सिंहांचे वक्तव्य!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशात तेथील सरकारने महाराजा हरिसिंग यांची जयंती 23 सप्टेंबर रोजी इथून पुढे सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. याबद्दल त्यांचे चिरंजीव आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉ. करण सिंह यांनी केंद्रातील मोदी सरकारचे आणि जम्मू-काश्मीर सरकारचे आभार मानले आहेत. My connection with the Congress ends; Senior leader Dr. Statement by Karan Singh

    त्याचवेळी डॉ. करण सिंह यांनी काँग्रेसशी आपल्या संबंधांविषयी स्वतंत्र भाष्य केले आहे. मी आजही काँग्रेसचा सदस्य जरूर आहे. परंतु, गेल्या सात आठ वर्षात काँग्रेस मधले माझे सर्व संबंध संपुष्टात आले आहेत. काँग्रेस मधले कोणीही नेते माझ्या संपर्कात नाहीत. माझे सध्या स्वतंत्र काम चालू आहे, असे वक्तव्य डॉ. करण सिंह यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.

    1967 मध्ये मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मला काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली. केंद्रात मी मंत्री होतो. संसदेचा सदस्य होतो. परंतु मध्यंतरी मला काँग्रेस कार्यकारणीतून वगळले. त्यानंतर आता गेल्या सात-आठ वर्षांमध्ये काँग्रेसच्या नेत्यांपैकी कोणीही माझ्या संपर्कात नाही. माझे काम स्वतंत्रपणे सुरू आहे, असे डॉ. करण सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

    आझादां पाठोपाठचा धक्का

    जम्मू-काश्मीर मधून काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम-नबी आझाद यांनी पक्ष सोडला आहे. ते नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या पाठोपाठ डॉ. करण सिंह यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याने आपले काँग्रेस मधले संबंध संपुष्टात आल्याचे वक्तव्य करणे याला राजकीय दृष्ट्या विशेष महत्त्व आहे.

    काँग्रेसमध्ये आता ज्येष्ठ नेत्यांना सन्मान मिळत नाही अशी तक्रार अनेकांनी यापूर्वी केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, नंतर गुलाम नबी आझाद आणि आता करण सिंह यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनी एक प्रकारे काँग्रेस पासून नुसते अंतरच राखले नसून त्यांनी थेट काँग्रेसच्या विद्यमान नेतृत्वाच्या क्षमते विषयी शंका उपस्थित केल्याचे दिसून येत आहे.

    My connection with the Congress ends; Senior leader Dr. Statement by Karan Singh

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य