विशेष प्रतिनिधी
उज्जैन – एका मुस्लिम व्यक्तीला ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यास भाग पाडल्याप्रकरणी पोलिसांना दोघांना अटक केली आहे. याबाबतचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर झळकल्यानंतर त्याबाबत कारवाई करण्यात आली.
दोघे जण मुस्लीम व्यक्तीचा हात पकडून ठेवून ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्याची बळजबरी करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. Muslim pressurized for chanting jai shriram
सुरुवातीला या मुस्लीम व्यक्तीने अशा घोषणा देण्यास नकार दिला. तेव्हा अशा घोषणा देण्यात तुला काय अडचण आहे, अशी विचारणा त्या दोघांनी केल्याचेही दिसत आहे. वारंवार याबाबत विचारणा केल्यानंतर संबंधित मुस्लिम व्यक्तीने ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
“आमच्या गावात येऊन कमावतोस कसा? परवानगी घेऊन येतोस का? मग ‘जय श्री राम’ म्हणायला काय हरकत आहे? तुला ‘जय श्री राम’ म्हणावेच लागेल”, असे म्हणत त्या दोघांनी संबंधित मुस्लिम व्यक्तीचा हात पकडून ठेवला. त्यामुळे, अखेर त्या व्यक्तीने ‘जय श्री राम’ म्हणत “आता तुम्ही खूष आहात का?” अशी विचारणा केली. त्यावर, त्या दोघांनी “आता आम्ही खूष आहोत” असे म्हटल्याचे व्हिडिओत दिसत आहे. आता या दोघांवरही कारवाई करण्यात आली आहे.
Muslim pressurized for chanting jai shriram
महत्त्वाच्या बातम्या
- संपादक, लेखक आनंद अंतरकर यांचे निधन
- पुणे महापालिकेचा तुघलकी आदेश, कोरोना नियमभंग करणाऱ्यांकडून दिवसाला दहा लाख रुपये वसूल करा
- मुख्यमंत्री खट्टर यांना विरोध करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज, राहुल गांधी म्हणाले – फिर खून बहाया किसान का
- स्मार्ट पार्किंगला मुंबईत सुरुवात आधुनिक सुविधेला नागरिकांचा तुफान प्रतिसाद