विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जय श्रीरामच्या घोषणांन अल्ला हू अकबर घोषणेने उत्तर देणाऱ्या बीबी मुस्कान या मुस्लिम विद्यार्थिनीला ‘जमियत उलेमा ए हिंद’ने ५ लाखांचे बक्षीस घोषित केले आहे.कर्नाटकात ‘हिजाब बंदी’च्या वादात अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती आहे. हिजाबवरून सुरू असलेल्या वादात एका मुस्लिम विद्यार्थिनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.Muslim organization gives Rs 5 lakh reward to student who responds to Jai Shri Ram’s announcement with Allah Hu Akbar’s slogan
हिजाब घातलेल्या या मुस्लिम विद्यार्थिनीला जमावाने घेरले. तिच्यासमोर जय श्रीराम च्या घोषणा दिल्या जात आहेत. त्याला ही मुस्लिम विद्यार्थिनी ‘अल्लाहू अकबर’चा नारा देताना व्हिडिओत दिसत आहे. बीबी मुस्कान असे या मुस्लिम विद्यार्थिनीचे नाव आहे., कारण…’
एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सोशल मीडियावर व्हायर होत असलेल्या व्हिडितील बीबी मुस्कान या मुस्लिम विद्यार्थिनीच्या धाडसाचे कौतुक केले आहे. ‘जमियत उलेमा ए हिंद’ने बीबी मुस्कानला या मुस्लिम विद्यार्थिनीला ५ लाखांचे बक्षीस घोषित केले आहे. ‘जमियत उलेमा ए हिंद’ने मुस्लिम विद्यार्थिनी मुस्कान खानचे अभिनंदन केले आहे.
तिला ५ लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे, अशी माहिती ‘जमियत उलेमा ए हिंद’चे अध्यक्ष हजरत मौलाना महमूद असद मदनी यांनी दिली. आपल्या घटनात्मक आणि धार्मिक हक्कांसाठी विरोधाच्या तीव्र आणि तापलेल्या वातावरणात ठामपणे मुस्कानने सामना केला, असे ‘जमियत उलेमा ए हिंद’द्वारे जारी करण्यात आलेल्या निवेदनात मौलाना मदनी यांनी म्हटले आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुस्कान खानने माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. असाइनमेंटसाठी मी कॉलेजला गेले होती. यावेळी एक मोठा जमाव तिथे आला आणि आपल्याला बुरखा काढून कॉलेजमध्ये जाण्यास सांगितले. त्यावेळी जमावाने जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. या जमावात कॉलेजच्या बाहेरचे काही लोकही होते, असा आरोप मुस्कानने केला आहे.
Muslim organization gives Rs 5 lakh reward to student who responds to Jai Shri Ram’s announcement with Allah Hu Akbar’s slogan
महत्त्वाच्या बातम्या
- डीएसके’ फसवणूक प्रकरणाची सुनावणी आता मुंबईत
- पंजाबात पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीबाबत भाष्य करण्यास मोदींचा नकार, मात्र त्याचवेळी सांगितली पंजाबमधली भावूक आठवण!!
- पाच राज्यांच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात उद्या मतदान; काँग्रेस, समाजवादी सह सर्व परिवारवादी पक्षांवर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!!
- पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण परिसराचा वीजपुरवठा पूर्ववत