विशेष प्रतिनिधी
लखनौ : गोरखनाथ मंदिराचे रक्षण करणाऱ्या सैनिकांवर प्राणघातक हल्ल्याचा आरोपी अहमद मुर्तझा अब्बासी हा जिहादी शिकवण्या तयार करत होता. पोलिसांनी पकडण्यापूर्वी मुर्तझा अनेक बँक खात्यांमध्ये पैसे पाठवून निधी उपलब्ध करून दिला होता. ही बाब समोर आल्यानंतर यंत्रणांनी तपासाला वेग दिला आहे. Murtaza Abbasi was preparing jihadi teachings
मुर्तझाने डॉलरमध्ये विदेशी सिम विकत घेतले होते, ज्याचा वापर तो प्रतिबंधित वेबसाइट शोधण्यासाठी करत होता. दुसरीकडे, मंगळवारी रात्रीच कोर्टाकडून वॉरंट बी आणि रिमांड मिळाल्यानंतर एटीएसचे पथक मुर्तजाला घेऊन लखनौला गेले आहे. लखनौमध्येच चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुर्तजाच्या अटकेपासून एटीएस, एसटीएफ आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याबाबत दररोज धक्कादायक तथ्ये समोर येत आहेत. एटीएस आणि एसटीएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुर्तझाने डॉलर वापरून विदेशी सिम खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे.
याच्या मदतीने तो बंदी घातलेल्या वेबसाईटवर सर्च करून जिहादी व्हिडिओ पाहत असे. मुर्तजाकडून नेपाळी चलनासह डॉलरही सापडले आहेत. अनेक खात्यांतून तो ५० हजार रुपये पाठवत असे, असेही समोर आले आहे.
नोकरीच्या काळात त्यांने जो काही पैसा उभा केला, तो जिहादच्या शिकवण्या तयार करण्यात खर्च केला. नेपाळच्या बँक खात्यांद्वारे सीरियातील वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये सुमारे आठ लाख रुपये पाठवण्यात आले आहेत. नेपाळ व्यतिरिक्त परदेशातही त्याची खाती चालवल्या जात असल्याच्या वृत्तावरून तपास तीव्र करण्यात आला आहे.
गोरखनाथ मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांवर ३ एप्रिल रोजी सायंकाळी ७.१५ च्या सुमारास एका तरुणाने धारदार शस्त्राने हल्ला केला होता. उपस्थित लोकांच्या मदतीने आरोपीला पोलिसांनी पकडले. मुर्तझा अब्बासी असे त्याचे नाव असून तो पार्क रोड, सिव्हिल लाईन्स येथे राहणारा आहे, असे समजले होते.
Murtaza Abbasi was preparing jihadi teachings
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिकांना तुरुंगात टाकल्यावर शरद पवार यांनी पंतप्रधानांना भेटण्याची तत्परता का दाखविली नाही, इम्तियाज जलील यांचा सवाल
- अमेरिका, ब्रिटनमध्येही पेट्रोलचे दर ५० टक्यांनी वाढले, भारतातील वाढ केवळ पाच टक्के, पेट्रोलियम मंत्र्यांनी केले स्पष्ट
- पतीच्या निधनानंतर व्यवसाय सांभाळला, आता आहे जगातील सर्वाधिक श्रीमंत महिलांच्या यादीत
- देशात २१ ग्रीनफिल्ड विमानतळांची उभारणी सुरू