विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : कर्नाटकातील शिवमोग्गा येथे हिजाबच्या वादातून बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची भोसकून हत्या करण्यात आली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर शिवमोग्गामध्ये तणाव वाढला आहे. हत्येनंतर अनेक कार्यकर्ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि त्यांनी या घटनेचा निषेध करण्यास सुरुवात केली. Murder of Bajrang Dal activist; Section 144 in Shivamogga, Reason for writing a post against hijab
कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी मृत बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या नातेवाईकांची भेट घेतली. ही घटना झाली. रविवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. हर्षा ( 26 वर्षीय) असे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचे नाव आहे.हर्षाने फेसबुक प्रोफाइलवर हिजाबच्या विरोधात पोस्ट लिहिली होती. त्याने भगव्या शालीचा वापर केला होता. पोलीस या प्रकरणाचा हिजाब वादाशी संबंध जोडून तपास करत आहेत.
अनेक हिंदू संघटना कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यास विरोध करत आहेत. हिजाबच्या निषेधार्थ हे कार्यकर्ते भगवी शाल परिधान करून निषेध व्यक्त करत आहेत.वाढता तणाव पाहता संपूर्ण शिवमोग्गामध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली आहेत. या घटनेबाबत पोलीस थेट काही बोलण्याचे टाळत आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणाव वाढला असून, त्यामुळे पोलीस अधिक सक्रिय झाले आहेत.
Murder of Bajrang Dal activist; Section 144 in Shivamogga, Reason for writing a post against hijab
महत्त्वाच्या बातम्या
- योगी आदित्यनाथ हे माझ्यापेक्षा चांगले मुख्यमंत्री; केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची कबुली
- तिलक, कुंकू, टिकली काढण्यास भाग पाडल्यास कठोर कारवाई : कर्नाटकचे शिक्षणमंत्री नागेश
- EPFO पेन्शन ; जीवन प्रमाणपत्र कधीही सबमिट करणे शक्य
- अखिलेश यादव यांच्यावर गुन्हा दाखल
- आठ सदस्यांची १४ दिवसांसाठी ‘स्थायी’ निवड