• Download App
    राजस्थानात उदयपूर मध्ये गळा चिरून युवकाची हत्या!!; हत्येचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला; राज्यात प्रचंड तणाव Murder of a youth by slitting his throat in Udaipur

    नुपुर शर्मा केस : राजस्थानात उदयपूर मध्ये गळा चिरून युवकाची हत्या!!; हत्येचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला; राज्यात प्रचंड तणाव

    वृत्तसंस्था

    उदयपूर : राजस्थान मध्ये नुपूर शर्माच्या समर्थनार्थ फेसबुक लिहिणाऱ्या एका युवकाची दोन युवकांनी गळा चिरून हत्या केली आणि त्यावेळी सर तन से जुदा असे नारे लगावत या निर्घृण हत्येचा व्हिडिओ बनवला. रियाज अख्तारी आणि मोहम्मद गौस अशी आरोपींची नावे असून या दोघांनाही ताबडतोब अटक करावी अशी मागणी उदयपुरवासीयांनी केली आहे. Murder of a youth by slitting his throat in Udaipur

    कन्हैयालाल या युवकाच्या या निर्घृण हत्येनंतर उदयपूरसह संपूर्ण राजस्थानात प्रचंड तणाव असून जमावाने ठिकठिकाणी टायर जाळून या घटनेचा निषेध केला आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल करून राज्यामध्ये अशांतता फैलावू नये, असे आवाहन केले आहे.

    नूपुर शर्मा हिने कथित स्वरूपात मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात काही वक्तव्य केले होते. त्यावरून मध्यंतरी संपूर्ण देशभरात मोर्चे काढून आधीच तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न काही कट्टर पंथीयांनी केला होता. या मोर्चामध्ये सर तन से जुदा अशा हिंसक घोषणा दिल्या होत्या.

    आज दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास रियाज अक्तरी आणि मोहम्मद गोसे दोन युवक उदयपूर मध्ये कन्हैयालाल टेलरिंग दुकानात घुसले. त्यांनी कपड्याचे माप देण्याचा बहाणा केला आणि या दोघांनी कन्हैयालाल यांची तलवार आणि सुरीने गळा चिरून हत्या केली. रियाज अक्षरी आणि मोहम्मद गौस यांनी दोन कन्हैया लाल यांच्यावर हल्ला चढवला. त्यांची गळा चिरून हत्या केली त्या निर्घृण हत्येचा व्हिडिओ देखील बनवला. या व्हिडिओमध्येच ते दोघेही सर तन से जुदा असे नारे लगावताना दिसत आहेत.

    कन्हैयालालने नुपुर शर्माच्या समर्थनात फेसबूक पोस्ट लिहिल्याचा आरोप यांनी केला आहे. मात्र या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण राजस्थानामध्ये प्रचंड तणाव पसरला असून ठिकठिकाणी निदर्शने होत आहेत. उदयपूर मधील इंटरनेट सेवा राज्यातील अशोक गहलोत सरकारने बंद केली आहे. परंतु या हत्येचा कन्हैयालाल हत्येचा व्हिडिओ संपूर्ण देशभर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हायरल झाला असून त्याचा जोरदार निषेध होताना दिसत आहे त्याविरुद्ध प्रचंड संताप उसळला आहे.

    Murder of a youth by slitting his throat in Udaipur

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार