भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामासंदर्भात एक ट्वीट केलं होत .Munde’s sister meets Gadkari in Delhi; Political circles and discussions abound
विशेष प्रतिनिधी
दिल्ली : भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या भगिनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटण्यासाठी राजधानी दिल्लीत पोहचल्या आहेत.गडकरी यांच्या निवासस्थानी ही भेट होणार आहे.काही दिवसांपूर्वी गडकरी-मुंडे यांच्यातील महामार्गाच्या विषयावरून होणारा पत्रप्रपंच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान आता या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या. रस्त्यांच्या कामाचं कौतुक विरोधक देखील करत असतात. मात्र भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामासंदर्भात एक ट्वीट केलं होतं. या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या की , “पैठण पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग 752 ला काम पूर्ण होण्याच्या आधीच भेगा पडल्या आहेत. माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी यांना पत्र लिहीनच. त्यांनाही हे अजिबात चालणार नाही. तात्काळ दखल घेतली जाईल,”सोबतच पंकजा मुंडे यांनी एक फोटो देखील पोस्ट केला .यावर नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने तात्काळ दखल घेत संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
या ट्वीटला लगेच नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून उत्तर देण्यात आलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये सांगितलं आहे की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व खराब झालेले रस्त्यांची कामं देखील लवकरात लवकर केली जातील.
Munde’s sister meets Gadkari in Delhi; Political circles and discussions abound
महत्त्वाच्या बातम्या
- पीएम मोदींचे सीव्हीसी- सीबीआयच्या संयुक्त परिषदेला संबोधन, म्हणाले, देशाला लुटणारे कितीही शक्तिशाली असले तरी आमचे सरकार त्यांना सोडत नाही!
- देशात उत्तर आणि दक्षिणेत पूर आणि भूस्खलनाचा हाहाकार; उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे 47, तर केरळमध्ये पुरामध्ये 27 जणांचा मृत्यू
- महेंद्रसिंग धोनी आमच्या कोणापेक्षाही दूरवर फटकावू शकतो चेंडू
- रामदास आठवेलंचं धक्कादायक विधान ; म्हणाले – अजित पवारांना या छाप्यांनी फारसा फरक पडणार नाही