वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या (Imran Khan) पक्षाने बुधवारी रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे एडिटर अन चीफ अर्णब गोस्वामी यांच्या (Arnab Goswami) डिबेट शोमध्ये 26/11 च्या आतंकवादी हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. पाकिस्तान तहरीक – ए- इंसाफ (पीटीआय) चे प्रवक्ता अब्दुल समद याकूब (Abdul Samad Yaqoob) यांनी मान्य केले की, मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील अजमल आमिर कसाब (Mohammed Ajmal Amir Kasab) आणि इतर दहशतवादी पाकिस्तानचे होते. Mumbai 26/11 Terror Attack: 26/11 attacks were carried out by Pakistani terrorists; Confession of Imran Khan’s party in Arnab Goswamis Debate show
दरम्यान मेजर जनरल (रि.) जीडी बख्शी यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. ते म्हणाले की, पाकिस्तान सैन्याच्या एक किमीच्या परिसरात ओसामा होता. असा दावा केला जात होता की, ओसामा तोरा बोरा गुहेत होता. परंतु मुळात ओसामा एका बगंल्यात होता. जो बंगला त्याने आपल्या पत्नीसाठी घेतला होता. 26/11 चा दहशतवादी हल्ला नोव्हेंबर 2008 साली मुंबई येथे करण्यात आला होता. लष्कर-ए-तोयबाने (एलईटी) मुंबईत 12 ठिकाणी गोळीबार आणि बॉम्ब स्फोट केला होता. यामध्ये नऊ दहशतवाद्यांसह 174 नागरिक मारले गेले होते. मुंबई पोलिसांना अजमल कसाब या एका दहशतवाद्याला जिवंत पकण्यात यश आले होते. अजमल कसाबला 12 नोव्हेंबर 2012 साली सकाळी 7:30 वाजता फाशी देण्यात आली होती.
भारतीय सैन्याने ताब्यात घेतलेला दहशवादी अली बाबर पात्राने कॅमेरासमोर कबुल केले आहे की, त्याला पाकिस्तानी सैन्य आणि त्यांची गुप्तचर यंत्रणा इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) ने प्रशिक्षित केले होते. त्याने मीडियाशी बोलताना सांगितले की, त्याच्या आजारी आईच्या उपचारासाठी 25,000 रुपयांची अर्थिक मदत करण्यात आली होती. तसेच त्याने सांगितले की, पाकिस्तानी सैन्याने जम्मू काश्मिरमध्ये घुसखोरी करण्यास देखील मदत केली होती.
या शिवाय त्याने पाकिस्तानच्या कामाचा देखील पर्दाफाश करताना तरूणांना इस्लाम धर्म धोक्यात आहे. मी गरीब आहे. मी एका मुलाला भेटलो जो लष्कर-ए-तोयबा (Lashkar-e-Taiba) चा होता. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर मी लगेच काम करण्यास सुरूवात केली. माझ्या एका मोठ्या बहिणीची आणि एका भावाचा मृत्यू झाला आहे.
Mumbai 26/11 Terror Attack: 26/11 attacks were carried out by Pakistani terrorists; Confession of Imran Khan’s party in Arnab Goswamis Debate show
महत्त्वाच्या बातम्या
- भंगारातून रेल्वेने केली 227.71 कोटी रुपयांची कमाई
- शशी थरूर, मनीष तिवारी यांनीही कपिल सिब्बल यांची बाजू उचलून धरली!!
- नारायण राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र…; सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 38 रूग्णवाहिकांची केली मागणी
- पश्चिम बंगालची पोटनिवडणूक : ममता बॅनर्जी जिंकल्या तरच मुख्यमंत्रीपदी राहणार, भवितव्य मतदान यंत्रात बंद, रविवारी निकाल जाहीर; अख्ख्या देशाचे लक्ष
- 2022 मध्ये प्रदर्शित होणार आलीया भट्टचा ‘गंगुबाई काठियावाडी’ सिनेमा