उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पाटीर्ला मोठा झटका बसला आहे. माजी मुख्यमंत्री व सपाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांच्या कुटुंबात पुन्हा फूट पडली आहे. मुलायमसिंह यांच्या भाची संध्या यादव भाजपाकडून निवडणूक लढविणार आहे.Mulayam Singh Yadav’s family splits again, his nephew will contest from BJP
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पाटीर्ला मोठा झटका बसला आहे. माजी मुख्यमंत्री व सपाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांच्या कुटुंबात पुन्हा फूट पडली आहे. मुलायमसिंह यांच्या भाची संध्या यादव भाजपाकडून निवडणूक लढविणार आहे.
जिल्हा परिेदेच्या अध्यक्षा असलेल्या संध्या यादव यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला मैनपुरी येथून भाजपाकडून निवडणूक लढवणार आहेत. जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी त्यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे.
संध्या यादव या बदायूंचे माजी खासदार धर्मेंद्र यादव यांची बहीण आहेत. मैनपुरीच्या जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष देखील आहेत. मागील निवडणूक त्यांनी समाजवादी पार्टीच्या तिकीटावर जिंकली होती. मात्र यंदा त्यांनी भाजपाच्या उमेदवार म्हणून बुधवारी आपली उमेदवारी दाखल केली.
संध्या यादव यांचे पती अनुजेश प्रताप यादव यांनी यापूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाने संध्या यादव यांच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदावर अविश्वास ठराव आणला होता. परंतु, तो फेटाळला गेला. त्यामुळे त्या समाजवादी पक्षापासून दूर गेल्या होत्या.
मुलायम सिंह यादव यांच्या धाकट्या भावाची संध्या मुलगी आहेत. त्यांचे लहान भाऊ हे मैनापुरीतील खासदार असून सध्या पश्चिम उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांचीच थोरली बहिण भाजपामध्ये गेल्यामुळे कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे.
मुलायम यांचे दुसरे भाऊ शिवपाल यादव पहले यापूर्वीच अखिलेश यादव यांच्यावर नाराज होऊन दुसऱ्या पक्षात गेले होते. मुलायम यांची धाकटी सून अपर्णा यादवही भाजपाच्या संपर्कात आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाची त्यांनी अनेकदा ताखीफ केली आहे.