• Download App
    मुकुल रॉय यांची आमदारकी धोक्यात, शुभेंदू अधिकारींचा विधानसभा अध्यक्षांना अर्ज, पक्षबदल कायद्यान्वये कारवाईची मागणी । Mukul Roys MLA status in danger, Subhendu Adhikari application to Assembly Speaker, demand for action under party change law

    मुकुल रॉय यांची आमदारकी धोक्यात, शुभेंदू अधिकारींचा विधानसभा अध्यक्षांना अर्ज, पक्षबदल कायद्यान्वये कारवाईची मागणी

    Mukul Roys MLA status in danger : 7 दिवसांपूर्वी 11 जून रोजी भाजपकडून तृणमूलमध्ये परतलेले मुकुल रॉय यांची आमदारकी अडचणीत आली आहे. पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे आमदार शुभेंदू अधिकारी यांनी मुकुल रॉय यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष बिमान बॅनर्जी यांना अर्ज केला आहे. Mukul Roys MLA status in danger, Subhendu Adhikari application to Assembly Speaker, demand for action under party change law


    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : 7 दिवसांपूर्वी 11 जून रोजी भाजपकडून तृणमूलमध्ये परतलेले मुकुल रॉय यांची आमदारकी अडचणीत आली आहे. पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे आमदार शुभेंदू अधिकारी यांनी मुकुल रॉय यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष बिमान बॅनर्जी यांना अर्ज केला आहे.

    शुभेंदू यांनी आपल्या अर्जात मुकुल रॉय यांच्यावर पक्षबदल कायद्यानव्ये अपात्रतेची मागणी केली आहे. भाजपचे आमदार मनोज तिग्गा यांनी ही माहिती दिली.

    मुकुल रॉय यांची घरवापसी

    11 जून रोजी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय आणि त्यांचा मुलगा सुभ्रंश रॉय तृणमूलमध्ये दाखल झाले होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे खासदार पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत सुमारे 4 वर्षांनंतर ते तृणमूलमध्ये परतले. यापूर्वी 2017 मध्ये त्यांनी तृणमूल सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

    आपले जुने सहकारी परत आल्यावर ममतांनी म्हटलं होतं की, मुकुल यांनी माझ्या किंवा पक्षाविरोधात कधीही खोटी विधाने केली नाहीत. ममता म्हणाल्या की, ज्यांनी पक्षावर टीका केली, भाजप आणि पैशांसाठी निवडणुकीआधी पक्षाला धोका दिला त्यांची घरवापसी होणार नाही, ते गद्दार आहेत.

    Mukul Roys MLA status in danger, Subhendu Adhikari application to Assembly Speaker, demand for action under party change law

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!