• Download App
    Gangster Act Case : मुख्तार अन्सारीला १० वर्षांची शिक्षा, पाच लाखांचा दंड; गाझीपूरच्या विशेष एमपी-एमएलए कोर्टाचा निकाल Mukhtar Ansari sentenced to 10 years, fined five lakhs Judgment of Special MP MLA Court of Ghazipur

    Gangster Act Case : मुख्तार अन्सारीला १० वर्षांची शिक्षा, पाच लाखांचा दंड; गाझीपूरच्या विशेष एमपी-एमएलए कोर्टाचा निकाल

    हे प्रकरण भाजपाचे माजी आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येशी संबंधित आहे.

    विशेष प्रतिनिधी

    गाझीपूर : मुख्तार अन्सारीचा समावेश असलेल्या गँगस्टर अॅक्ट प्रकरणात शनिवारी शिक्षा सुनावण्यात आली. गाझीपूरच्या ‘एमपी-एमएलए’ कोर्टाने १६ वर्षे जुन्या प्रकरणात माजी आमदाराला १० वर्षांची शिक्षा सुनावली. यासोबतच न्यायालयाने पाच लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. Mukhtar Ansari sentenced to 10 years, fined five lakhs Judgment of Special MP MLA Court of Ghazipur

    गाझीपूरच्या ‘एमपी-एमएलए’ न्यायालयाने शनिवारी मऊचे माजी आमदार मुख्तार अन्सारी यांना गँगस्टर अॅक्ट प्रकरणात शिक्षा सुनावली. हा निकाल देताना न्यायालयाने त्याला दहा वर्षांचा कारावास आणि पाच लाखांचा दंडही ठोठावला. हे प्रकरण भाजपाचे माजी आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येशी संबंधित आहे.

    या प्रकरणात बसपाचे विद्यमान खासदार आणि मुख्तार अन्सारी यांचा भाऊही गँगस्टर कायद्याखाली आहे. मात्र, न्यायालयाने त्यांच्याबाबतचा निकाल राखून ठेवला आहे.

    हे आहे प्रकरण –

    मुख्तार अन्सारी यांच्याविरुद्ध हे गुन्हे भाजपाचे दिवंगत आमदार कृष्णानंद राय आणि नंदकिशोर गुप्ता यांच्या हत्येप्रकरणी दाखल करण्यात आले आहेत. मुख्तार आणि अफजाज अन्सारी यांच्याविरुद्ध मुहम्मदाबाद पोलीस ठाण्यात २००७ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुख्तार अन्सारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बांदा कारागृहाशी जुडलेला होता. २००५ मध्ये कृष्णानंद राय यांची मुहम्मदाबादमधील बसनिया चट्टीजवळ हत्या करण्यात आली होती.

    Mukhtar Ansari sentenced to 10 years, fined five lakhs Judgment of Special MP MLA Court of Ghazipur

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य