Sunday, 11 May 2025
  • Download App
    मोगल राज्यकर्ते हे खरे राष्ट्रनिर्माते ! दिग्दर्शक कबीर खान म्हणतो चित्रपटांतील मोगलांचे राक्षसी चित्रण पाहणे नकोसे वाटते|Mughal rulers are true nation builders! Director Kabir Khan says he doesn't want to see monstrous depictions of Mughals in films

    मोगल राज्यकर्ते हे खरे राष्ट्रनिर्माते ! दिग्दर्शक कबीर खान म्हणतो चित्रपटांतील मोगलांचे राक्षसी चित्रण पाहणे नकोसे वाटते

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मोगल राज्यकर्ते हे खरे राष्ट्रनिर्माते होते. मात्र, हिंदी चित्रपटांत मोगल राज्यकर्त्यांचे केले जाणारे राक्षसी आणि खलनायकी चित्रण पाहणे नकोसे वाटते. किमान काही संशोधन करून मोगलंचा इतिहास मांडावा असे मत दिग्दर्शक कबीर खान याने व्यक्त केले आहे.Mughal rulers are true nation builders! Director Kabir Khan says he doesn’t want to see monstrous depictions of Mughals in films

    बजरंगी भाईजान आणि न्यूयॉर्कसारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक असलेल्या कबीर खानने म्हटले आहे की केवळ लोकप्रियता मिळविण्यासाठी मोगलांचे खलनायकी चित्रण केले जात आहे. त्यासाठी कोणताही ऐतिहासिक पुरावा पाहिला जात नाही. हे पाहणे खूपच त्रासदायक आणि अस्वस्थ करणारे आहे.



    एखाद्या चित्रपट निर्मात्याने संशोधन केले असते किंवा चित्रपट निर्मात्याला एखादा मुद्दा मांडायचा असतो तेव्हा मी समजू शकतो. तुम्हाला मोगलांना खलनायक म्हणून दाखवायचेच असेल तर त्यासाठी काही संशोधन करा. ते खलनायक होते हे पटवून द्या.

    मोगल राज्यकर्ते हे मूळ राष्ट्रनिर्माते होते. पण त्यांनी खून केले असे म्हणणे, त्या आधारावर त्यांचा इतिहास लिहिणे यासाठी कोणता आधार घेत आहात. ऐतिहासिक पुरावे पाहा. खुली चर्चा करा केवळ लोकप्रियता मिळविण्यासाठी काही करू नका, असेही कबीर खानने म्हटले आहे.

    गेल्या काही वर्षांत निर्माण झालेल्या पद्मावत, पानिपत आणि तान्हाजी या चित्रपटांतील ऐतिहादिक अचूकता वादाच्या भोवºयात सापडली आहे. तान्हाजी चित्रपटातील कलाकार अभिनेता सैफ अली खान यानेही कबुल केले होते की काही तथ्ये त्यामध्ये चुकीच्या पध्दतीने दाखविली होती. इतिहास काय होता याची मला पूर्ण जाणीव आहे. पण काही कारणास्तव त्यावेळी भूमिका घेतली नव्हती. मात्र, कदाचित पुढच्या वेळी आपण भूमिका घेऊ.

    Mughal rulers are true nation builders! Director Kabir Khan says he doesn’t want to see monstrous depictions of Mughals in films

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज