विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत स्वातंत्र्याच्या शताब्दीकडे वाटचाल करीत असताना पुढील 25 वर्षे कर्तव्य बजावणे हा देशासाठी मंत्र असला पाहिजे आणि हा संदेश संसद आणि राज्यांच्या विधानसभांतून जावा. खासदारांचे वर्तन हे भारतीय तत्त्वांप्रमाणे असावे, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.MPs should behave according to Indian principles, expects Prime Minister Modi
82 व्या अखिल भारतीय भारतीय पीठासीन अधिकाºयांच्या परिषदेच्या आभासी उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मोदी म्हणाले, आपली एकताच आपली विविधता जपते. दर्जेदार आणि निकोप चचेर्साठी विधिमंडळांमध्ये वेगळी वेळ ठेवण्यात यावी. ही चर्चा गंभीर, दर्जेदार असावी,
पण परस्परांवर राजकीय हल्ले करणारी नसावी, अशी कल्पना त्यांनी मांडली. विविध मुद्यांवर संसदेच्या कामकाजात व्यत्यय येतो याकडे लक्ष वेधताना, त्यांनी खासदारांचे वर्तन हे भारतीय तत्त्वांप्रमाणे असावे. भारतीय लोकशाही ही एक केवळ व्यवस्था नसून, हा एक स्वभाव आहे.
MPs should behave according to Indian principles, expects Prime Minister Modi
महत्त्वाच्या बातम्या
- पवार निघाले ममतांच्या पाठोपाठ; दिल्लीत जाऊन काँग्रेस फोडली!!; जी – 23 मधला नेता लावला राष्ट्रवादीच्या गळाला!!
- पूर्वांचल एक्स्प्रेसवर दिसली देशाची एअर पॉवर, पंतप्रधान मोदींची हर्क्युलस विमानातून एक्स्प्रेसवर एंट्री
- काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने दोन व्यापारी आणि दोन दहशतवाद्यांना टिपले
- दहशतवादाचा चिथावणीखोर झाकिर नाईकच्या इस्लामिक रिसर्च’वरील बंदी पुन्हा वाढविली