• Download App
    जगनमोहन रेड्डींविरोधात बोलणाऱ्या खासदाराला पोलीसांची थर्ड डिग्री, चालता येईना इतकी कोेठडीत मारहाण|MP who spoke against Jaganmohan Reddy beaten by police in third degree, unable to walk

    जगनमोहन रेड्डींविरोधात बोलणाऱ्या खासदाराला पोलीसांची थर्ड डिग्री, चालता येईना इतकी कोेठडीत मारहाण

    वायएसआर कॉँग्रेसचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या विरोधात बोलल्याची शिक्षा म्हणून पक्षाच्या बंडखोर खासदाराला पोलीसांनी कोठडीत थर्ड डिग्रीचा वापर केला. त्यांना इतकी प्रचंड मारहाण करण्यात आली की चालताही येत नव्हते. जगनमोहन रेड्डी यांचा जामीन रद्द केल्याची मागणी केल्याने कनमुरु रघु रामा कृष्णन राजन या खासदारांवर देशद्रोहाचा आरोप ठेऊन अटक करण्यात आली आहे.MP who spoke against Jaganmohan Reddy beaten by police in third degree, unable to walk


    विशेष प्रतिनिधी

    अमरावती : वायएसआर कॉँग्रेसचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या विरोधात बोलल्याची शिक्षा म्हणून पक्षाच्या बंडखोर खासदाराला पोलीसांनी कोठडीत थर्ड डिग्रीचा वापर केला. त्यांना इतकी प्रचंड मारहाण करण्यात आली की चालताही येत नव्हते.

    जगनमोहन रेड्डी यांचा जामीन रद्द केल्याची मागणी केल्याने कनमुरु रघु रामा कृष्णन राजन या खासदारांवर देशद्रोहाचा आरोप ठेऊन अटक करण्यात आली आहे.देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले खासदार राजू यांना न्यायालयात हजर करण्यात आले.



    राजू यांच्यावर थर्ड डिग्रीचा प्रयोग करण्यात आला. मारहाणीमुळे त्यांना चालणेही अवघड झाल्याचे वकीलांनी सांगितले. राजू यांची नुकतीच बायपास सर्जरी झालेली आहे. त्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

    नरसपुरमचे खासदार कनमुरी रघुराम कृष्णम राजू यांना आंध्र प्रदेश गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली. बंडखोर वायएसआर कॉंग्रेसच्या नेत्याने सीबीआयच्या विशेष कोर्टाला पक्षाचे संस्थापक, मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना दिलेला जामीन रद्द करण्यास सांगितले.

    राज्य सरकारच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने हानिकारक मागार्ने वागल्याप्रकरणी राजू यांना हैदराबाद येथील त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. त्याच्यावर कलम १२4 ए (देशद्रोह), १33 ए (वेगवेगळ्या गटांमधील वैर वाढविणे) आणि 5०5 (सार्वजनिक छळवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू यांच्याविरोधात अशी माहिती मिळाली होती की त्यांनी काही समाजांविरूद्ध द्वेषयुक्त भाषणे केली आहेत आणि सरकारविरूद्ध अस्वस्थता आणली आहे.

    विविध सरकारी मान्यवरांवर अशा प्रकारे हल्ला करून त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवरील तसेच त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारवरील लोकांचा विश्वास कमी करण्यासाठी प्रयत्न केले.

    राजू यांनी सीबीआयच्या विशेष कोर्टाकडे विशेष म्हणजे जगन मोहन रेड्डी यांना अप्रत्यक्ष मालमत्ता प्रकरणात दिलेला जामीन २०१२ पासून रद्द करण्यास सांगितले होते. मुख्यमंत्र्यांनी जामीनच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचा दावा त्यांनी केला होता.

    पोलीस कोठडीत असताना राजू यांच्या कोठडीत अचानक पाच जणांनी प्रवेश केला. त्यांनी रुमालांनी आपले चेहरे झाकले होते. हल्लेखोरांनी राजू यांचे हातपाय दोरीने बांधले आणि काडीने पायावर फटके दिले. एकाने तर रबराच्या कडक काठीने मारले.

    थोडा वेळ मारहाण केल्यावर त्यांनी खासदार राजू यांना कोठडीत चालण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा त्यांना काठीने फटके देण्यात आले. त्यांना अगदी अर्धमेले केल्यावर हल्लेखोर निघून गेले. न्यायाधिशांनी त्यांचे पाय पाहिल्यावर वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले. खासदार राजू यांना वाय कॅटेगरीची सुरक्षा देण्यात आली आहे.

    राजू यांच्या शरीरीवर झालेल्या जखमांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरलझाले आहेत.भारतीय जनता पक्षाचे सरचिटणिस सुनील देवधर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की आत्तापर्यंत वायएसआर कॉँग्रेस ही राऊडी पार्टी मानली जात होती. परंतु, आता पोलीस खातेही या राऊडी पार्टीचा एक भाग बनले आहे.

    MP who spoke against Jaganmohan Reddy beaten by police in third degree, unable to walk

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य