• Download App
    खासदार राजीव प्रताप रुडी यांनी केले भाजपाच्या नेत्यांच्या विमानाचे सारथ्य, मनोज तिवारी यांची सहा महिन्यांची मुलगीही सोबत|MP Rajiv Pratap Rudy flew the BJP leader's plane, along with Manoj Tiwari's six-month-old daughter

    खासदार राजीव प्रताप रुडी यांनी केले भाजपाच्या नेत्यांच्या विमानाचे सारथ्य, मनोज तिवारी यांची सहा महिन्यांची मुलगीही सोबत

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि माजी नागरी विमान वाहतूक मंत्री राजीव प्रताप रुडी संसदेच्या नागरी विमान वाहतूक आणि पर्यटन स्थायी समितीच्या सदस्यांच्या विमानाचे खास सारथ्य करणार आहेत. रुडी यांनी ट्विटरवर व्हिडीओ टाकून याबाबत माहिती दिली आहे.MP Rajiv Pratap Rudy flew the BJP leader’s plane, along with Manoj Tiwari’s six-month-old daughter

    रुडी हे कमर्शीअल पायलट असून अनाऊन्समेंट करताना दिसत आहेत. त्यामध्ये म्हणत आहेत की बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तिर्थसिंग रावत, भापा खासदार मनोज तिवारी आणि अनेक खासदार आणि त्यांचे कुटुंबिय इंडिग्स करोच्या विमानातून प्रवास करत असल्याचे सागत आहे.



    आपल्यासाठी हा एक सुंदर आणि ऐतिहासिक दिवस असल्याचे रुडी म्हणत आहेत.रुडी यावेळी प्रवाशांना आवाहन करत आहेत की विमानातील सर्वात लहान प्रवाशाचे स्वागत करा. खासदार मनोज तिवारी यांची सहा महिन्यांची मुलगी सानविका ही देखील या प्रवसात सोबत होती.

    आमच्या बरोबर आजचा सर्वात छोटा प्रवासी लहान बाळ सानिका आहे. तिच्या पहिल्या प्रवासासाठी सगळ्यांनी शुभेच्छा द्या असेही ते म्हणत आहेत.द्रविड मुनेत्र कळघमचे खासदार दयानिधी मारन यांनी नुकताच रुडी यांच्या विमानातून प्रवास केला होता.

    संसदेचे एक खासदार आणि माजी नागरी विमान वाहतूक मंत्री आज आमच्या विमानाचे सारथ्य करत आहेत. आम्हाला दिल्लीहून चेन्नईला सुखरूपपणे उड्डाण दिल्याबद्दल खासदार कॅप्टन राजीवप्रताप रुडी यांचे आभार! असे त्यांनी म्हटले होते.

    MP Rajiv Pratap Rudy flew the BJP leader’s plane, along with Manoj Tiwari’s six-month-old daughter

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही