• Download App
    खासदार नवनीत राणा यांचा चुलीवरचा स्वयंपाक व्हायरल साधेपणा सोशल मीडियावर झळकला|MP Navneet Rana's Cooking Video goes viral

    खासदार नवनीत राणा यांचा चुलीवरचा स्वयंपाक व्हायरल साधेपणा सोशल मीडियावर झळकला

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : खासदार नवनीत राणा यांचा चुलीवर स्वयंपाक करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. खासदार असूनही त्या चुलीवर पोळी आणि भाकरी तयार करत असून त्यांच्या साधेपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.MP Navneet Rana’s Cooking Video goes viral

    सिनेअभिनेत्री म्हणून उत्कृष्ट काम करणाऱ्या नवनीत राणा राजकारणात देखील सक्रिय आहेतच. एशियन पोस्ट ऑफ इंडिया यात देशातील २५ खासदारांमध्ये नवनीत राणाची ओळख आहे. लोकसभेत अनेक महत्वाचे मुद्दे घेऊन नवनीत राणा आता भारतात ओळखल्या जात आहेत.



    मात्र खासदार नवनीत राणाचा असाही साधेपणा आपण कधीच पहिला नसेल. होय चित्रफितीत चुलीवर स्वयंपाक करीत दिसणाऱ्या याच त्या खासदार नवनीत राणा. त्या खासदार जरी असल्यात तरी देखील आजही साधेपणा त्याच्यात दिसतो. मेळघाटात चक्क आदिवासी लोकांमध्ये मिसळून राहतात. त्यांच्या संस्कृतीमध्ये सुद्धा त्या डान्स करतात.

    मेळघाटसारखा अतिदुर्गम भाग उजेडात यावा. आदिवासींना रोजगार मिळावा याकरिता खासदार राणा सातत्याने प्रयत्न करताहेत. आज त्याचा चुलीवर स्वयंपाक करण्याचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर प्रचंड व्हायरल होतोय.

    •  खासदार नवनीत राणा यांचा चुलीवरचा स्वयंपाक
    •  लोकसभेत अनेक महत्वाचे मुद्यावर रोखठोक मत
    •  मेळघाटच्या आदिवासी लोकांमध्ये मिसळून राहतात
    • मेळघाटच्या आदिवासी संस्कृतीमध्ये सुद्धा डान्स
    • आदिवासींना रोजगार मिळावा, यासाठी प्रयत्नशील

    MP Navneet Rana’s Cooking Video goes viral

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!