Sunday, 11 May 2025
  • Download App
    खासदार गोपाळ शेट्टी यांची माणुसकी, आफ्रिकेवरून विमानतळावर आलेल्या प्रवाश्याच्या सुटकेसाठी चक्क पहाटे आले धावून|MP Gopal Shetty's humanity, rushing for the release of a passenger who arrived at the airport from Africa

    खासदार गोपाळ शेट्टी यांची माणुसकी, आफ्रिकेवरून विमानतळावर आलेल्या प्रवाश्याच्या सुटकेसाठी चक्क पहाटे आले धावून

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: आफ्रिकेतुन आलेल्या एका प्रवाशाच्या मदतीसाठी पहाटे पाच वाजता विमानतळावर धावून येत खासदार गोपाळ शेट्टी यांनी माणुसकीचा प्रत्यय दिला.छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावावर आज पहाटे पांच वाजता आफ्रिकेतून आलेल्या एक प्रवाश्याला मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी आरटीपीसीआर रिपोर्ट असून सुध्धा लसीचे दोन डोस घेतले नाही म्हणून अडविले होते. हॉटेल मध्ये क्वारंटाईन तुमच्या खर्चाने व्हावे लागेल असे सांगण्यात आले.MP Gopal Shetty’s humanity, rushing for the release of a passenger who arrived at the airport from Africa

    मुंबई महानगर पालिकेत काम करणाऱ्या या प्रवाश्याच्या आईची उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांची ओळखही नव्हती. तिने पहाटे पांच वाजता त्यांना फोन केला एका सामान्य महिलेच्या मदतसाठी ते चक्क सहा वाजता वाजता एअरपोर्टवर उपस्थित राहून त्यांनी या प्रवाश्याची सुटका केली.



    प्रवाश्याच्या आई वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार ते संबधीत अधिकाऱ्यांना सांगत होते की, आमच्या कडे पैसे नसून तुम्ही सांगतात त्या हॉटेल मध्ये आम्ही जाऊच शकत नाही. त्यावर अधिकाऱ्यांनी सांगितले की, मग दहा हजार भरा तर आम्ही तुम्हाला मुक्त करतो. विरार वरून बसचे तिकीट काढून आलेल्या प्रवाश्याच्याआईने दहा हजार भरायची क्षमता नाही म्हणून शंभर नंबर वर फोन केला, पण पोलीसनी प्रतिसाद दिले नाही. वरिष्ठ पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांना सुद्धा फोन केला. मात्र तिथूनही प्रतिसाद मिळाला नाही.

    शेवटी प्रवासी आणि त्याच्या आई वडिलांनी उत्तर मुंबई खासदार गोपाळ शेट्टी यांना पहाटे पाच वाजता फोन केला. अनोळखी फोनवर ते मदतीसाठी चक्क सकाळी सहा वाजता चक्क विमानतळावर आले. जर दक्षिण आफ्रिका येथे लसीकरण सुरूच नाही झाले तर ते लस कसे घेऊ शकतात ? दुसर त्यांचे आर टी पी सी आर रिपोर्ट आहे, ते कोरोना निगेटिव्ह आहे.

    आणि त्यावर क्वारंटाईन करायचे तर त्यांना परवडणार तिथे जाऊ द्या. तुम्ही महागड्या हॉटेल साठी का आग्रह का धरतात असा सवाल त्यांनी संबंधितअधिकाऱ्यांना केला. या प्रश्नावर अधिकारी निरुत्तर झाले आणि या प्रवाश्यांची अखेर मुक्तता करण्यात आली.

    हेल्पलाईन सेंटर विमानतळ वर तत्काळ सुरु करण्यात यावे. महानगरपालिका जर सुरू करत नसेल तर आम्ही भाजप पक्ष वतीने सुरू करु, असे खासदार शेट्टी यांनी सांगितले आहे.मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र देणार असून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे हाल करू नका. त्यांची योग्य ती काळजी घ्या आणि प्रवाश्यांना पंच तारांकित हॉटेल मध्ये न पाठवता त्यांना बीकेसी येथील क्वारंटाईन सेंटरचा उपयोग करा. या प्रवाश्याला त्रास देणाऱ्या संबधित पालिका अधिकाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली.

    MP Gopal Shetty’s humanity, rushing for the release of a passenger who arrived at the airport from Africa

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार