• Download App
    'मदर इंस्पेक्टर-दंतेश्वरी फायटर' शिल्पा साहू ऑन ड्युटी ; कडक सॅलूट।Mother Inspector-Danteshwari Fighter' Shilpa Sahu on duty; Strict salute showered with admiration on social media

    ‘मदर इंस्पेक्टर-दंतेश्वरी फायटर’ शिल्पा साहू ऑन ड्युटी ; कडक सॅलूट

    डीएसपी शिल्पा साहू या रस्त्यावर उभ्या राहून नागरिकांना आपल्या घरातच राहण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. तसेच मास्कचा वापरही करण्यास सांगत आहेत. कडाक्याचे उन असतानाही त्या रस्त्यावर उभ्या राहून आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या या कार्याचे व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियातही प्रचंड व्हायरल होत असून त्यावर युजर्स कौतुकांचा वर्षाव करताना दिसत आहेत. ‘Mother Inspector-Danteshwari Fighter’ Shilpa Sahu on duty; Strict salute showered with admiration on social media


    विशेष प्रतिनिधी

    दंतेवाडा : कोरोनाचा कहर वाढत असून या काळात गरोदर स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांनी आरोग्य जपावे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. या काळात गरोदर स्त्रियांनी घराबाहेर पडणेही धोक्याचे आहे. पण आपल्या व्यक्तिगत आयुष्यापेक्षा कर्तव्याला महत्त्व देऊन छत्तीसगढ येथील दंतेवाडाच्या पोलिस अधीक्षक शिल्पा साहू या पाच महिन्यांच्या गरोदर असूनही बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. दंतेवाडा जिल्ह्यातील बस्तरमध्ये नक्षलग्रस्त भागात कर्तव्‍य बजावणार्‍या या महिला अधिकाऱ्याचे नावे शिल्पा साहू असे असून त्यांचे बंदोबस्ताचे फोटो व्हायरल होत आहेत.

    देशभरात कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने ठिकठिकाणी संचारबंदी तर कुठे लॉकडाऊन लावण्यात आले आहे.

    पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कॉन्स्टेबलपर्यंत सर्वजण कोरोना महामारीत भरउन्हात सेवा देत आहेत. मध्य प्रदेशातील दंतेवाडा येथे शिल्पा साहू डीएसपी आहेत. त्या पाच महिन्यांच्या गरोदर आहेत. तरीही त्या हातात काठी घेऊन बंदोबस्तावर देखरेख करत आहेत. त्यांच्या या कामाचे कौतुक होत असून त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. मध्य प्रदेशातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे फोटो ट्विट करून त्यांच्या कामाला सलाम केला आहे.

    शिल्पा साहू या मावोवाद्यांचा प्रभाव असलेल्या बस्तरमध्ये कार्यरत आहेत. त्या आपल्या टीमसह रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांची तपासणी करत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिल्ह्यात लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केले पाहिजे. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे. विनाकारण बाहेर पडत असाल तर स्वत:बरोबर दुसऱ्यालाही धोका निर्माण करत आहात, असे आवाहन त्‍या करत आहेत.

    ट्रेनिंगवेळी जीवनसाथीची निवड

    २०१६ मध्ये पोलिस ट्रेनिंग अकॅडमीत सध्या एसडीओपी असलेल्या देवांश सिंग राठाेड यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यानंतर ट्रेनिंग पूर्ण होईपर्यंत त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नात अनेक अडचणी आल्या मात्र, त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही. ही जोडी आता डिस्ट्रिक रिझर्व्ह गार्डच्या (डीआरजी) ऑपरेशनचे नेतृत्व करते. यात देवांश सिंग हे पुरुषांच्या तर शिल्पा साहू या डीआरजी टीम दंतेश्वरी फायटर्सचे नेतृत्व करतात. लग्न झाल्यानंतर पोलिस महासंचालक डी. एम. अवस्थी यांना विनंती करून दंतेवाडा येथे एकत्र पोस्टिंग मागून घेतली. त्यावेळी देवांशसिंग डीआरजी डीएसपी होते.

    ट्रेनिंग दरम्यान झाली होती भेट

    शिल्पा साहू यांच्या पतीचे नाव देवांश सिंह राठोड असे आहे. देवांश हे सुद्धा डीएसपी आहेत. एका मुलाखतीत देवांश यांनी सांगितले होते की, शिल्पा आणि माझी भेट एका ट्रेनिंग दरम्यान झाली होती. त्यानंतर आमची मैत्री झाली आणि जवळीक वाढली. मग आम्ही दोघांनी लग्न केलं. जून 2019 मध्ये आम्ही विवाहबंधनात अडकलो.

    नक्षलविरोधी अभियानासाठी शिल्पा-देवांश एकत्र जात

    डीएसपी शिल्पा साहू आणि त्यांचे पती देवांश यांची सुरुवातीला पोस्टिंग नक्षलग्रस्त जिल्ह्यात झाली होती. अद्यापही शिल्पा दंतेवाडा येथे कार्यरत आहे. शिल्पा आणि देवांश हे दोघेही नक्षलविरोधी अभियानासाठी एकत्र जात असत. त्यांचे पती देवांश सिंह राठोड हे नक्षलविरोधी बटालियनचे नेतृत्व करत असत, तर शिल्पा दंतेश्वरी फायटरचे नेतृत्व करत असत.

    ‘Mother Inspector-Danteshwari Fighter’ Shilpa Sahu on duty; Strict salute showered with admiration on social media

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य