• Download App
    मोस्ट वॉन्टेड अतिरेकी अबू झरारीचा खात्मा, भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांचे यश | Most wanted terrorist abu zarari gunned down. success of Indian Army and Jammu and Kashmir Police

    मोस्ट वॉन्टेड अतिरेकी अबू झरारीचा खात्मा, भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांचे यश

    विशेष प्रतिनिधी

    जम्मू : दहशतवाद ही देशाला लागलेली कीड आहे. दहशतवादी कारवाया करणे, स्थानिक लोकांना दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी करून घेणे, असे आरोप असणारा एका अतिरेक्याचा खात्मा नुकताच जम्मू काश्मीर पोलिसांच्या साहाय्याने भारतीय लष्कराने केला आहे.

    Most wanted terrorist abu zarari gunned down. success of Indian Army and Jammu and Kashmir Police

    जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबू झरार याला त्याच्या पाकिस्तानमधील म्होरक्यांनी असे आदेश दिले होते की, पूंछ राजोरी भागामध्ये पुन्हा एकदा दहशतवादी कारवाया सुरू करण्यात याव्यात. यासाठी स्थानिक लोकांचा खास करून तरूणांचा देखील सहभाग करून घेण्यात यावा. त्यामुळे अबू झरार आणि त्याचे साथीदार जंगलामध्ये लपून छपून या कारवाई करण्यासाठी रचना आखत होते.


    JAMMU KASHMIR: “जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा फोन करा” ; भारत-पाकिस्तान सीमेवर राहणाऱ्या व्यक्तीला अमित शाहंनी दिला नंबर


    पण त्यांना अन्न,धान्य आणि कपडय़ांसाठी स्थानिक लोकांशी संपर्क साधावा लागला होता. अशाप्रकारे अबू झरारीच्या मोबाइल संभाषणावर पोलीस लक्ष ठेवून होते. आणि त्यानुसारच पोलिसांना त्याच्या ठावठिकाण्याची माहिती मिळाली. आणि ही कारवाई करण्यात जम्मू काश्मीर पोलिसांना यश आले.

    Most wanted terrorist abu zarari gunned down. success of Indian Army and Jammu and Kashmir Police

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य