• Download App
    आज २०० कोटींहून अधिक डोस राज्यांकडे उपलब्ध : अदार पूनावाला । More than 200 crore doses available to states today: Adar Poonawala

    आज २०० कोटींहून अधिक डोस राज्यांकडे उपलब्ध – अदार पूनावाला

    अदार पूनावाला म्हणाले की लसीबद्दल संकोच हा साथीचा रोग रोखण्यात खूप मोठा धोका निर्माण करत आहे.कोविड-१९ लसीचे २०० कोटी डोस राज्यांकडे पडून आहेत. More than 200 crore doses available to states today: Adar Poonawala


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी बुधवारी सर्व प्रौढ नागरिकांना अँटी-कोविड लस घेण्याचे आवाहन केले आहे.तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी देखील सर्व पात्र नागरिकांना लसीकरण करण्याचे आवाहन केले.

    अदार पूनावाला म्हणाले की लसीबद्दल संकोच हा साथीचा रोग रोखण्यात खूप मोठा धोका निर्माण करत आहे.कोविड-१९ लसीचे २०० कोटी डोस राज्यांकडे पडून आहेत.त्यामुळे लोकांनी लवकरात लवकर लसीकरण केले पाहिजे. कंपनी Covishield मोठ्या प्रमाणावर लसीचे उत्पादन करत आहे.अस देखील पूनावाला म्हणाले.

    त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “लस उद्योगाने देशासाठी पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी खूप परिश्रम केले आहेत.दरम्यान आज २०० कोटींहून अधिक डोस राज्यांकडे उपलब्ध आहेत. म्हणून मी सर्व प्रौढ नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर लसीकरण करावे.कोविड-१९ या साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी लसीबाबत संकोच आता सर्वात मोठा धोका आहे.”

    पूनावाला म्हणाले की , भारतातील प्रौढ लोकसंख्येपैकी केवळ ४० टक्के लोकसंख्येला पूर्णपणे लसीकरण केले गेले आहे कारण संक्रमण कमी झाल्यामुळे अनेकांनी त्यांचा दुसरा डोस वगळला आहे. COWIN डॅशबोर्डनुसार, देशातील सुमारे ९३ कोटी प्रौढांपैकी ३८ कोटींहून अधिक लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.असा उल्लेख देखील अदार पूनावाला यांनी केला आहे.

    More than 200 crore doses available to states today: Adar Poonawala

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!