वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारत सरकारने अफगाणिस्तानातील 100 हून अधिक शीख आणि हिंदू नागरिकांना भारताचा व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने ई-व्हिसा जारी केला आहे. एक दिवस आधी 18 जून रोजी राजधानी काबूलमधील गुरुद्वारा कर्ते परवानवर दहशतवादी हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी येथे अनेक स्फोट घडवले होते.More than 100 Sikh-Hindus living in Afghanistan get Indian visas, Gurdwara attacked yesterday
या हल्ल्यात गुरुद्वाराचा मुस्लिम सुरक्षा रक्षक ठार झाला. तिघांना बाहेर काढण्यात आले. त्यापैकी दोघांना जखमी अवस्थेत रुग्णालयात पाठवण्यात आले. कर्ते परवान गुरुद्वारा समितीच्या सदस्याने माध्यमांना सांगितले की, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पवित्र ग्रंथ जतन केला
गुरुद्वारावरील हल्ल्यानंतर पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला. अफगाण शीख पवित्र ग्रंथ सुरक्षित करण्यासाठी आग लागलेल्या इमारतीत घुसले होते. या हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे (MEA) प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले होते की, पवित्र गुरुद्वारावरील हल्ल्याच्या वृत्ताने आम्ही खूप चिंतित आहोत.
हल्ल्यामागे इसिस खोरासानचा हात
काबूलमधील गुरुद्वारावरील हल्ल्यामागे ISIS खोरासानचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. हा हल्ला सकाळी 7.15 वाजता (भारतीय वेळेनुसार 8.30 वाजता) झाला. गुरुद्वाराचे रक्षण करताना 3 तालिबानी सैनिकही जखमी झाले. हल्ल्याच्या वेळी गुरुद्वारामध्ये 25-30 अफगाण हिंदू आणि शीख सकाळच्या प्रार्थनेसाठी उपस्थित होते.
More than 100 Sikh-Hindus living in Afghanistan get Indian visas, Gurdwara attacked yesterday
महत्वाच्या बातम्या
- Religiophobia : धार्मिक भयाचा प्रपोगंडा “निवडक” आणि दुटप्पी नको; भारताने अमेरिका, इस्लामी देशांना ठणकावले!!
- भाजप म्हणतोय गणिताचा आधार; आघाडीची फोडाफोडीवर मदार!!; फडणवीसांच्या डावाने होणार कोण गपगार??
- विधान परिषद निवडणूक : शिवसेनेचा आज वर्धापनदिन जल्लोषात नव्हे, दबावात; मैदानात नव्हे, हॉटेलात
- विधान परिषद : मतांच्या जुळवाजुळवी आधी कापाकापी!!; देशमुख, मालिकांची मते कापली; रवी राणांविरुद्ध अटक वॉरंट!!