• Download App
    पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून : असंसदीय शब्दांची पुस्तिका प्रकाशित, वाचा शब्दांची यादी|Monsoon session from 18th July: Booklet of unparliamentary words published, read list of words

    पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून : असंसदीय शब्दांची पुस्तिका प्रकाशित, वाचा शब्दांची यादी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होणार आहे. लोकसभा सचिवालयाने असंसदीय शब्द व भाव यांची पुस्तिका प्रकाशित केली आहे. त्यानुसार लोकसभा व राज्यसभेच्या कामकाजात बालबुद्धी, कोविड स्प्रेडर, स्नूपगेट, लाजिरवाणे, दुर्व्यवहार, विश्वासघात, भ्रष्ट यासारख्या शब्दांचा वापर असंसदीय मानला जाणार आहे. नवीन पुस्तिकेत नाटक, पाखंड, अक्षम या शब्दांना असंसदीय घोषित करण्यात आले आहे.Monsoon session from 18th July: Booklet of unparliamentary words published, read list of words



    त्याशिवाय पुढील शब्दही असंसदीय मानले जातील : अराजकतवादी, हुकूमशाही, जयचंद, विनाश पुरुष, खलिस्तानी, बिनकामी, नौटंकी, मारणे, बहिरे सरकार यांचाही यादीत समावेश केला आहे. इंग्लिशमधील ब्लडशेड, ब्लडी, बेट्रॉइड, अशेम्ड, अब्यूज्ड, चिटेड इत्यादीदेखील असंसदीय मानले जातील. चमचा, चमचेगिरी, चेला, भेकड, गुन्हेगार, मगरीचे अश्रू, गाढव, धोका, गुंडगिरी, भ्रामक, खोटे हे शब्दही असंसदीय ठरणार आहेत. दंगा, दलाल, दादागिरी, बेचारे, बॉबकट, लॉलीपॉप, संवेदनाहीन, मूर्ख, लैंगिक शोषणही असंसदीय ठरतील.

    Monsoon session from 18th July: Booklet of unparliamentary words published, read list of words

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य