• Download App
    स्विस बँकांमध्ये भारतीयांचे पैसे वाढले तिपट्ट , कोरोना काळातील चित्र; २० हजार कोटी जमा|Money of Indians increased three times in Swiss banks; over Rs 20000 crore

    स्विस बँकांमध्ये भारतीयांचे पैसे वाढले तिपट्ट , कोरोना काळातील चित्र; २० हजार कोटी जमा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : स्विस बँकांमधील भारतीयांनी ठेवलेल्या पैशांमध्ये काेराेनाच्या काळातही माेठी वाढ झाली आहे. तब्बल २० हजार काेटींहून अधिक रक्कम विविध बँकांमध्ये जमा झाली आहे. स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेने याबाबत माहिती जाहीर केली आहे. Money of Indians increased three times in Swiss banks; over Rs 20000 crore

    स्विस बँकांमध्ये वर्ष २०१९ च्या अखेरीस सुमारे ६ हजार ६०० काेटी रुपये जमा हाेते. मात्र, गेल्या वर्षी काेराेनाच्या काळातही त्यात तीन पटींहून अधिक वाढ झाली. स्विस बँकांच्या भारतातील विविध शाखा तसेच इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून २० हजार ७०० काेटीहून अधिक रक्कम जमा झाली.



    यापैकी ४ हजार काेटी बँक खात्यांमध्ये, ३१०० काेटी इतर बँकांमध्ये तसेच सर्वाधिक १३ हजार ५०० काेटी रुपये बाँड, सुरक्षा ठेव व इतर माध्यमांद्वारे गुंतविले आहेत. ग्राहकांच्या खात्यातील ठेवी मात्र घटल्या आहेत. हे अधिकृत आकडे असून भारतीयांनी दडविलेल्या काळ्या पैशाशी त्याचा संबंध नसल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.

    Money of Indians increased three times in Swiss banks; over Rs 20000 crore

    विशेष प्रतिनिधी

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!