• Download App
    ईडी कारवाई : इक्बाल मिर्चीशी मनी लॉन्ड्रींग; प्रफुल्ल पटेलांचे सीजे हाऊस मधील चार मजली घर जप्त!!money laundering with Iqbal Mirchi; Praful Patel's four storied house in CJ House seized

    ईडी कारवाई : इक्बाल मिर्चीशी मनी लॉन्ड्रींग; प्रफुल्ल पटेलांचे सीजे हाऊस मधील चार मजली घर जप्त!!

    प्रतिनिधी

    मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिरची याच्याकडून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी वरळीतील सी जे हाऊस मध्ये घेतलेल्या घरावर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने जप्तीची टाच आणली आहे. सीजे हाऊस मधले प्रफुल्ल पटेल यांच्या ताब्यातले पहिले चार मजले ईडीने जप्त केले आहेत. money laundering with Iqbal Mirchi; Praful Patel’s four storied house in CJ House seized

    1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्ची याच्याकडून प्रफुल्ल पटेल यांनी वरळीतील सीजे हाऊस ही मालमत्ता मनी लॉन्ड्रींग मार्फत विकत घेतली होती. या संदर्भात त्यांची ईडीने चौकशी देखील केली होती. परंतु या चौकशीत समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या ताब्यातले सीजे हाऊस मधले चार मजले जप्त केले आहेत. यापैकी दोन मजल्यांवर प्रफुल्ल पटेल यांचे घर आहे. येथेच प्रफुल्ल पटेल यांचे कुटुंब राहत होते आणि दोन मजले त्यांनी भाड्याने दिले आहेत.

    – देशमुख – मलिक – पटेल

    शरद पवारांचे निकटवर्ती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रमांक दोनचे नेते असणारे प्रफुल्ल पटेल ईडीच्या कारवाईच्या कचाट्यात सापडलेले राष्ट्रवादीचे तिसरे नेते आहेत. याआधी 100 कोटीच्या खंडणी प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. तसेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांची देखील मालमत्ता मनी ऑनलाईन प्रकरणाचा जप्त केली आहे. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर हिच्याबरोबर मनी लॉंड्रिंगचे व्यवहार होते. अनिल देशमुख आणि नबाब मलिक हे सध्या तुरुंगात आहेत.

    वरळी मधील सीजे हाऊसमधील प्रफुल्ल पटेलांचे घर जप्त करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच हे प्रकरण समोर आले होते, त्यापार्श्वभूमीवर ईडीने ही कारवाई केली आहे. प्रफुल्ल पटेल हे सध्या मुंबईतच असून, काही वेळापूर्वी ते वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये दिसले होते.

    – शरद पवारांचे नंबर 2

    प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे ते अतिशय निकटवर्तीय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रफुल्ल पटेल यांच्या शरद पवार यांच्यानंतर दोन नंबरचे स्थान आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. सध्या ते राष्ट्रवादीचे राज्यसभेवर खासदार आहेत. युपीएचे सरकार सत्तेत होते तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात ते नागरी हवाई वाहतूक मंत्रीही होते.

    money laundering with Iqbal Mirchi; Praful Patel’s four storied house in CJ House seized

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chabahar Port : परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण- चाबहार बंदराबाबत भारताला एप्रिलपर्यंत सवलत, अमेरिकेसोबतही चर्चा सुरू

    Rafale Jets : भारत 114 राफेल जेट्स खरेदी करणार; मेक इन इंडिया अंतर्गत तयार होतील; संरक्षण मंत्रालयाच्या समितीची मंजुरी

    Sajad Lone : जम्मू-काश्मीरला दोन स्वतंत्र राज्ये बनवण्याची मागणी; सज्जाद लोन म्हणाले- सलोख्याने वेगळे होण्यावर विचार करण्याची वेळ