ओवैसी म्हणाले की पंतप्रधान मोदी काही बाबतीत अजिबात तोंड उघडत नाहीत, ते जाणीवपूर्वक मौन बाळगतात.Modiji angry over petrol-diesel prices and infiltrated China: Owaisi
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : AIMIM पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. यावेळी ओवैसी म्हणाले की पंतप्रधान मोदी काही बाबतीत अजिबात तोंड उघडत नाहीत, ते जाणीवपूर्वक मौन बाळगतात.यात एक म्हणजे पेट्रोल-डिझेलच्या किंमती आणि देशात घुसलेला चीन याबाबत मोदीजी चिडीचूप आहेत. कारण ते चीनला घाबरतात.
ओवैसी म्हणाले की, पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मात्र, त्याबद्दल पंतप्रधान शांतच बसतात.पेट्रोल-डिझेलची सेंच्यूरी झालीय, मात्र पंतप्रधान म्हणतात, मित्रो, फिकर मत करो!
दुसरीकडे चीन आपल्या देशात तळ ठोकून बसला आहे. जेंव्हा पुलवामा हल्ला घडला तेंव्हा मोदींनी म्हटलं होतं की, घर में घुस के मारेंगे! आम्ही म्हटलं, मारा! मात्र, आता चीन आपल्या देशात घुसून बसला आहे,तरीही मोदी काहीच करत नाहीयेत.अस देखिल ओवैसी म्हणाले.
भारताचे पंतप्रधान चीनबाबत बोलायला घाबरतात. असं वाटतंय की, ते चीनच्या भीतीमुळे चहामध्ये सुद्धा चीनी (साखर) टाकत नसतील. अशी टीका देखील ओवैसी यांनी केली आहे.
Modiji angry over petrol-diesel prices and infiltrated China: Owaisi
महत्त्वाच्या बातम्या
- विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : सूर्यमालेच्या टोकाला आढळला गॉबलिन नावाचा नवा बटू ग्रह
- एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावी फरार ; गोसावीच्या महिला असिस्टंटला अटक
- मध्य रेल्वेने जुन्या डब्यातच तयार केले ‘रेस्टॉरंट’; राज्यातील विविध स्थानकांमध्येही उभारणार
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना ईद-ए-मिलाद-उन्-नबीच्या दिल्या शुभेच्छा ; म्हणाले-पैगंबर मुहम्मद यांच्या जीवनापासून प्रेरणा घ्या