विशेष प्रतिनिधी
लखनऊ : काँग्रेसमधील सर्वेसर्वा गांधी घराण्याला तब्बल ५० – ६० वर्षांनी शास्त्री घराण्याची आठवण झाली. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी काँग्रेसच्या स्थापनेचा वर्धापन दिनाचा मुहूर्त साधत दिवंगत माजी पंतप्रधान लालबहदूर शास्त्री यांचे चिरंजीव सुनील शास्त्री यांची भेट घेतली.Modified ‘Kick Start Jeep’-Anand Mahindra’s tweet from scrap luggage! Dili ‘hi’ special offer
प्रियांका गांधी यांनी त्यांना काँग्रेसची सदस्यता दिल्याच्या बातम्या आल्या. त्याच बरोबर त्यांनी विविध विषयांवर चर्चा केल्याचाही बातम्या आल्या. या बातम्यांना फक्त प्रियांका गांधी यांच्या ट्विटरचा आधार होता. प्रियांका गांधी यांनी स्वतः ट्विट करून दिलेली माहिती प्रसारमाध्यमांनी चालविली. देश के लिए मिलकर लढेंगे जितेंगे, असे प्रियंका गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
पण ही भेट उलटून होऊन २४ तास उलटून गेले आहेत तरी देखील स्वतः सुनील शास्त्री यांनी आपले ट्विटर स्टेटस बदललेले नाही. त्यांनी आपल्या ट्विटर स्टेटसवर आज दुपारी चार वाजेपर्यंत तरी म्हणजे 29 डिसेंबर 2021 दुपारी चार वाजेपर्यंत तरी भाजप प्रवक्ते असल्याचे स्टेटस बदललेले नव्हते. सुनील शास्त्री हे माजी केंद्रीय मंत्री आहेत. सध्या भाजपचे प्रवक्ते आहेत, असे त्यातून स्पष्ट होताना दिसते.
याखेरीज प्रसार माध्यमांनी जरी सुनील शास्त्री यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या तसेच त्यांना मिर्झापूर मधून काँग्रेस विधानसभेसाठी तिकीट देण्याच्या बातम्या चालविल्या असल्या तरी स्वतः सुनील शास्त्री यांनी ट्विटर वर त्याला दुजोरा दिलेला नाही. किंबहुना सुनील शास्त्री यांनी प्रियांका गांधी यांच्या भेटीचा फोटो देखील ट्विट केलेला नाही.
उलट त्यांची सर्व जुनी ट्विटस् ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन करणारी दिसत आहेत. त्यामुळे सुनील शास्त्री यांनी नेमका काँग्रेस प्रवेश केला आहे का?, केला असल्यास त्यांना काँग्रेस पक्ष कोणता राजकीय रोल देणार?, याविषयी अजूनही शंका आहेत.
की सुनील शास्त्री यांनी प्रियांका गांधी यांची फक्त सदिच्छा भेट घेतली. प्रत्यक्षात त्यांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा वगैरे काहीच विचार नव्हता. स्वतः प्रियंका प्रियंका प्रियांका गांधी यांनीच पुढाकार घेऊन सुनील शास्त्री यांच्या भेटीचे ट्विट केले आहे.
याविषयी देखील राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. आज प्रियांका गांधी यांनी फिरोजाबाद मध्ये “लडकी हूं, लढ सकती हूं” या रॅलीला संबोधित केले. परंतु तेथे सुनील शास्त्री किंवा अन्य वरिष्ठ काँग्रेस नेते उपस्थित नव्हते.
Modified ‘Kick Start Jeep’-Anand Mahindra’s tweet from scrap luggage! Dili ‘hi’ special offer
महत्त्वाच्या बातम्या
- खासदार सुप्रिया सुळे कोरोना पॉझिटिव्ह, पती सदानंद सुळे यांनाही लागण
- Anil Deshmukh Case : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने केले मुख्य आरोपी, ७००० पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल
- अमरावतीत खळबळ , प्रवीण पोटे यांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात विजेचा शॉक लागून चार कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू
- आरोग्य विम्यावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल, विमा कंपनी मेडिक्लेम नाकारू शकत नाही, कारण… वाचा सविस्तर