वृत्तसंस्था
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर करताना निवडणूक आयोगाने 15 जानेवारी पर्यंत राजकीय पक्षांच्या मेळाव्यांवर, रॅलींवर, मोटार बाईक रॅलींवर सायकल फेऱ्यांवर बंदी घातली आहे.Modi – Yogi has made 10-15 visits to Uttar Pradesh, the only question is the propaganda of poor parties; Tikastra of Mallikarjun Kharge
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. प्रचारावर आलेली बंधने पाहता मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आधीच उत्तर प्रदेशचे 10 – 15 दौरे केले आहेत.
त्यामुळे सत्ताधारी भाजपला यापेक्षा जास्त प्रचाराची गरज नाही. प्रश्न फक्त आर्थिकदृष्ट्या गरीब पक्षांचा आहे. कारण ते मोठे मेळावे घेऊ शकत नाहीत. मोठ्या रॅली आयोजित करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्याच प्रचारावर मर्यादा येणार आहे. एक प्रकारे हा सत्तारूढ पक्षाला अनुकूल असाच निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात मोठे दौरे केले हे खरे आहे. परंतु त्याच वेळी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशात ठिकाणी “लडकी हूं लढ सकती हूं” यांसारखे उपक्रम अनेक शहरांमध्ये राबवले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरसह अनेक शहरांमध्ये प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी जाहीर सभा घेतल्या आहेत. याकडे मात्र मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले आहे.
Modi – Yogi has made 10-15 visits to Uttar Pradesh, the only question is the propaganda of poor parties; Tikastra of Mallikarjun Kharge
महत्त्वाच्या बातम्या
- Manipur Election 2022 : मणिपूरमध्ये 60 जागांसाठी दोन टप्प्यांत निवडणूक, 27 फेब्रुवारी आणि 3 मार्चला होणार मतदान, वाचा सविस्तर…
- UP Assembly Election : उत्तर प्रदेशात 10 फेब्रुवारी ते 7 मार्च असे सात टप्प्यांत होणार मतदान, वाचा सविस्तर…
- Assembly Election २०२२ Date : पाच राज्यांमध्ये निवडणूकीची घोषणा, १० मार्चला निकाल, यूपी-पंजाब-उत्तराखंड-गोवा आणि मणिपूरमध्ये कधी होणार मतदान? वाचा सविस्तर…
- दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांना कोरोनाची लागण , ट्विट करून दिली माहिती