वृत्तसंस्था
लखनऊ : दोन्ही नेत्यांची टार्गेट एक आहे पण मात्र नेतेपदाच्या चुरशीत मात्र तिसराच नेता भरपूर पुढे निघून गेला आहे, अशी अवस्था आजच्या घडीला उत्तर प्रदेशच्या राजकारणाची झाली आहे.राज्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे समाजवादी पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या समान टार्गेटवर आहेत.Modi-Yogi-Akhilesh-Priyanka clash over BJP
पण योगी हे लोकप्रियतेच्या निकषांवर अखिलेश आणि प्रियांका यांच्या भरपूर पुढे निघून गेलेले दिसत आहेत. प्रियांका गांधी या भाजप आणि योगी यांच्यावर एकामागून एक तिखट वार – प्रहार करत आहेत. त्याच वेळी अखिलेश यादव हे प्रियांकांना काटशह म्हणून त्याच दिवशी दुसऱ्या ठिकाणी मोठी रॅली घेऊन काँग्रेसवर हल्लाबोल करत आहेत. आज दिवसभर वाराणसी आणि सहारनपूर या दोन शहरांमध्ये हे राजकीय नाट्य घडलेले दिसले.
वाराणसीत प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि भाजप यांच्यावर तिखट हल्ला केला, तर सहारनपूर मध्ये अखिलेश यादव यांनी योगी सरकारला झोडून काढले. हे करत असताना प्रियांका गांधी आणि अखिलेश यादव यांनी एकमेकांच्या पक्षांना देखील चिमटे काढून घेतले. अखिलेश यादव यांचे राजकारण फक्त ट्विट पुरते मर्यादित आहे असा टोला प्रियांका गांधी यांनी हाणला, तर आम्ही पर्यटकांसारखे राज्यात येऊन राजकारण करत नाही, असा टोला अखिलेश यादव यांनी प्रियांकाचे नाव न घेता मारला.
लखीमपूर मधल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांच्यावर ते प्रियांका गांधी यांच्या मागे पडल्याची टीका होऊ लागली, त्यावेळी समाजवादी पक्षाचे नेते अस्वस्थ झाले. योगी आदित्यनाथ आणि भाजप यांच्या विरोधात लढाई करताना अखिलेश यादव सर्वात आघाडीवर असले पाहिजेत ही समाजवाद्यांची धारणा त्यांच्या संख्याबळानुसार योग्य आहे.
पण लखीमपूर मधल्या हिंसक घटनांचा राजकीय फायदा घेण्यात प्रियांका गांधी या अखिलेश यादव यांच्या पुढे निघून गेल्या असे विश्लेषण उत्तर प्रदेशातील हिंदी प्रसार माध्यमांनी केले होते. यातूनच अखिलेश यादव यांनी ताबडतोब समाजवादी विजय यात्रेची घोषणा करून टाकली. त्यातली पहिली रॅली त्यांनी सहारनपूरला घेतली.
प्रियंका गांधी आज वाराणसीमधून योगी सरकारवर आणि मोदी सरकारवर हल्ला करण्यापूर्वी अखिलेश यादव यांनी सहारनपूर मधून केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारवर हल्लाबोल करून घेतला. एक प्रकारे प्रियांका गांधी यांनी चालविलेल्या राजकारणाला काटशह देण्याचाच हा प्रकार मानला जात आहे.
राज्यातल्या विरोधी पक्षांची राजकीय स्पेस काँग्रेसला अधिक मिळताच कामा नये, हा समाजवादी पक्षाच्या नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळेच प्रियांका गांधी जसजशा पुढे सरकतील तसा त्यांच्या मार्गात राजकीय अडथळे तयार करण्याचे काम समाजवादी पक्षाचे नेते ठिकठिकाणी करताना दिसतील. त्या दृष्टीनेच अखिलेश यादव यांची समाजवादी विजय यात्रा संपूर्ण उत्तर प्रदेशात फिरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आजची सहारनपूरची रॅली हा त्यातला एक महत्त्वाचा घटक राहिला आहे.
Modi-Yogi-Akhilesh-Priyanka clash over BJP
महत्त्वाच्या बातम्या
- माझ्या कोकणवासीयांना साद, हातात हात गुंफून विकासाच्या यात्रेत सहभागी होऊयात! – नारायण राणे
- वसुली म्हटल्यावर सरकारचा ‘ससा’, शेतकऱ्यांना मदत म्हटलं की ‘कासव’; मदत तर त्याहून संतापजनक, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- भाजप विरोधात भाषणे करून ममता बॅनर्जी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसताहेत; अधीर रंजन चौधरी यांचे अचूक शरसंधान!!
- दुर्गा सन्मान : महिला आणि मुलींच्या संरक्षण – सक्षमीकरणात कायमच आघाडीवर!!, वैशाली केनेकर