प्रतिनिधी
अहमदाबाद : मोदी आडनाव बदनामी प्रकरणी राहुल गांधींच्या पुनर्विलोकन याचिकेवर आज गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी झाली. दोन दिवस युक्तिवाद ऐकल्यानंतर हायकोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. न्यायालय आता जूनमध्ये निकाल देण्याची शक्यता आहे.Modi surname defamation case, Rahul Gandhi has no relief for now, Gujarat High Court likely to deliver judgment in June
यापूर्वी शुक्रवारी ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी राहुल गांधी यांच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद केला. राहुल गांधींनी खून केलेला नाही, असे ते म्हणाले होते. शिक्षेला स्थगिती न दिल्यास त्यांना आठ वर्षे निवडणूक लढवता येणार नाही. राजकारणात आठवडाभरही मोठा कालावधी असतो, आठ वर्षांत याचिकाकर्त्याची राजकीय कारकीर्द संपुष्टात येऊ शकते.
सिंघवी यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्ती हेमंत प्रच्छक म्हणाले होते की, आता तक्रारदाराला त्यांची बाजू मांडू द्या. 2 मे रोजी या प्रकरण निकाली काढू. मला 5 मे नंतर वेळ नाही, मी भारताबाहेर जात आहे. त्यामुळे हे सर्व लवकर संपले पाहिजे.
23 मार्च रोजी सुरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधींना कलम 500 अंतर्गत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र, त्यांना कोर्टातून लगेच जामीन मिळाला. या शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोर्टात केली होती, जी कोर्टाने फेटाळली. यानंतर राहुल यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
राहुल गांधी यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी 29 एप्रिल रोजी न्यायालयात दिलेले 5 मोठे युक्तिवाद…
हा गंभीर गुन्हा नाही, त्यांनी खून केलेला नाही
राहुल गांधींच्या वतीने वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, हा गंभीर गुन्हा नाही. त्यांनी खून केलेला नाही, ज्याला क्षमा करता येणार नाही. जे आरोप सिद्ध होत आहेत त्यावर स्थगिती देण्याची मागणी आम्ही करत आहोत.
तसे न झाल्यास त्यांच्यावर 8 वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात येईल. नवज्योतसिंग सिद्धूचे उदाहरण देत सिंघवी म्हणाले की, सिद्धू यांना शिक्षेला स्थगिती मिळू शकते, तर राहुल गांधींना का नाही?
Modi surname defamation case, Rahul Gandhi has no relief for now, Gujarat High Court likely to deliver judgment in June
महत्वाच्या बातम्या
- द केरला स्टोरीवर बंदी नाहीच, सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका, कोर्टाने म्हटले, चित्रपटाला प्रमाणपत्र मिळाले आहे, हे हेटस्पीचचे प्रकरण नाही
- महाराष्ट्रात वाघांची संख्या 312 वरून 390 वर!!; व्याघ्र भ्रमण मार्गातील विकासाचे 19 प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे
- The Kerala Story : लव्ह जिहाद हा तर हिंदु आणि ख्रिस्ती महिलांच्या गर्भावरील दहशतवादी हल्ला!!
- वाचनप्रेमी पर्यटकांसाठी खुशखबर! MTDC रिसॉर्ट्समध्ये लवकरच असणार वाचनालयाची सुविधा