• Download App
    मोदी - राहुल - ममतांनी वळविले पश्चिम भारताकडे "राजकीय लक्ष्य!!" । Modi - Rahul - Mamata diverted to West India "Political target !!"

    मोदी – राहुल – ममतांनी वळविले पश्चिम भारताकडे “राजकीय लक्ष्य!!”

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : उत्तर प्रदेश गोवा पंजाब यांच्यासह पाच राज्यांच्या निवडणुका जवळ येत असताना तीन प्रमुख पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपले “राजकीय लक्ष्य” पश्चिम भारताकडे वळविले आहे. Modi – Rahul – Mamata diverted to West India “Political target !!”

    ममता बॅनर्जी यांनी गोव्याचा राजकीय कार्यक्रम कालच जाहीर केला आहे. त्या 28 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत गोव्यात ठाण मांडून बसणार आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातवर लक्ष केंद्रित करून मोदी शहांचे गृहराज्य टार्गेटवर घेतले आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गोव्याशी संबंधित महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सहभागी होत आहेत. आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत स्वयंपूर्ण झालेल्या उद्योजकांच्या गटांशी पंतप्रधान मोदी उद्या संवाद साधणार आहेत.

    या तीनही नेत्यांचे राजकीय कार्यक्रम पश्चिम भारताभोवती केंद्रित झाले आहेत. निवडणुका अजून पाच महिने लांब आहेत. गुजरातमधली निवडणूक अजून 13 महिने लांब आहे. तरीदेखील पक्ष संघटनेचे मजबुतीकरण आणि पायाभरणी यादृष्टीने हे तीनही नेते सिरीयस मोडवर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तर 24 तास ते निवडणूक मोडमध्ये असतात, असा आरोप होतच असतो. राहुल गांधी हे अधून मधून सुट्टी घेत असले तरी सध्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी सिरीयस मोडमध्ये काम करताना दिसत आहेत.



    त्यामुळेच त्यांनी गुजरातवर लक्ष केंद्रित करून 2017 मध्ये राहिलेला बॅकलॉग भरून काढण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे. काँग्रेस पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या गृह राज्यात भाजपशी टक्कर घेण्यासाठी सक्षम करण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न आहे आणि पक्ष संघटना देखील तेथे खऱ्या अर्थाने मजबूत आहे. कारण गुजरातमध्ये काँग्रेसचे 80 आमदार आहेत. ती संख्या वाढविण्यावर राहुल गांधींचा भर आहे.

    गोव्यात ममता बॅनर्जी यांनी माजी मुख्यमंत्री लुईजिनो फालेरो यांना तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नेमून तृणमूल काँग्रेसची पायाभरणी सुरू केली आहे. चार दिवस गोव्यात मुक्काम करून त्या पक्षबांधणीवर लक्ष देतील. विविध पक्षांचे नेते फोङून तृणमूल काँग्रेसची जोडून घेतील.

    या पार्श्वभूमीवर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत जे लाभार्थी उद्योजक ठरले त्यांच्याशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत. गोव्यामध्ये पर्यटनापासून ते अन्य उद्योगांच्या क्लस्टरपर्यंत विविध ठिकाणी गुंतवणूक कशी वाढते आहे, त्याचा स्थानिक युवकांना रोजगार निर्मिती आणि प्रत्यक्ष रोजगारासाठी कसा उपयोग होत आहे, या विषयी बोलण्यावर पंतप्रधानांचा भर असणार आहे. या तीनही नेत्यांनी आपले लक्ष राजकीय लक्ष्य या अर्थाने पश्चिम भारताकडे वळविले आहे…!!

    Modi – Rahul – Mamata diverted to West India “Political target !!”

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!