• Download App
    MODI-PUTIN MEET : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आज भारतात ! होणार एके-203 रायफल्स-डिफेन्स सिस्टीमचा सौदा ;०६ महिन्यात पुतीन यांचा पहिला दौरा । MODI-PUTIN MEET : Russian President Putin in India today! AK-203 rifles-defense system deal to be made; Putin's first visit in 06 months

    MODI-PUTIN MEET : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आज भारतात ! होणार एके-२०३ रायफल्स-डिफेन्स सिस्टीमचा सौदा ; ०६ महिन्यात पुतीन यांचा पहिला दौरा

    • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे आज, सोमवारी नवी दिल्लीत आगमन होणार आहे. पुतिन यांच्या या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये एके-२०३ असॉल्ट रायफल्सच्या निर्मितीसंदर्भातील ५ हजार १०० कोटींहून अधिक किंमतीच्या करारावर स्वाक्षऱ्या होणार आहेत. 
    • गेल्या सहा महिन्यांत प्रथमच एखाद्या देशाचा दौरा करत आहेत. भारत करत असलेली एक-४०० ची खरेदी म्हणजे ५ अब्ज डॉलरच्या शस्त्र खरेदी व्यवहाराचा भाग आहे. 

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन  आजपासून भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते भारत आणि रशिया यांच्या दरम्यान काही डिफेन्स डिलवर  स्वाक्षऱ्या होणार आहेत. तसच भारत चीन यांचे सध्याचे ताणलेले संबंध, भारत-पाक संबंध, अफगाणिस्तानमधली नाजूक स्थिती, त्यातला भारत-रशियाचा रोल ह्या सगळ्यांवर चर्चा अपेक्षीत आहे. अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांची शिष्टमंडळ स्तरीय चर्चा होईल. MODI-PUTIN MEET: Russian President Putin in India today! AK-203 rifles-defense system deal to be made; Putin’s first visit in 06 months

    रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन 6 डिसेंबर 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत 21व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी भारतात येतील, अशी घोषणा MEA चे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी शुक्रवारी केली होती.

    या दौऱ्यामधील महत्वाच्या निर्णयांमध्ये एके-२०३ असॉल्ट रायफलचा कराराचा समावेश आहे. या रायफल्सचे उत्पादन रशियाच्या मदतीने उत्तर प्रदेशमधील अमेठी येथील कोरवा येथील कारखान्यामध्ये केलं जाणार आहे. तसेच भारत आणि रशियाच्या संयुक्त प्रयत्नांमध्ये सुरु करण्यात आलेल्या कारखान्यामध्ये पाच लाखांहून अधिक रायफल्स निर्माण करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात येणार आहे. या स्वाक्षऱ्या झाल्यानंतर सात वर्षांमध्ये या कारखान्याचे पूर्ण हस्तांतरण करुन तो भारताच्या ताब्यात देण्यात येणार आहे. चार डिसेंबर रोजीच केंद्र सरकारने एके-२०३ असॉल्ट रायफलच्या निर्मितीसंदर्भातील व्यवहाराला मंजूरी दिली.

    तसच वन टू वनही चर्चा अपेक्षीत आहे. 2019 मध्ये ब्रासिलियामध्ये मोदी आणि पुतीन (Modi Putin Meet Today) यांची भेट झाली होती. त्यानंतर दोघांच्या भेटीची आणि चर्चेची ही पहिलीच वेळ आहे.



    नेमकी काय डील होणार?

    भारत-रशिया यांच्यातलं हे 21 वा शिखर संमेलन आहे (21st India Russian annual Meet). दोन्ही देशांचं शिष्टमंडळ चर्चेत भाग घेईल. भारताच्यावतीनं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसच संरक्षण मंत्री राजनाथसिंग हे भाग घेतील तर रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव प्रतिनिधीत्व करतील. दोन्ही देशात चीन-पाकिस्तान-अफगाणिस्तानसह विविधी द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा होणार आहे. पण चर्चेचं मुख्य आकर्षण आहे ती दोन्ही देशात होऊ घातलेली डिफेन्स डील.

    एके-203 रायफल्सची डील

    रशियानं एके-203 असॉल्ट रायफलची (AK-203 assault rifles ) निर्मिती केलेली आहे. संरक्षण करण्यासाठी ही एक अत्याधुनिक हत्यार मानलं जातं. पुतीन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात याच रायफल्सची डील होणार आहे. विशेष म्हणजे ह्या रायफल्सची निर्मिती उत्तर प्रदेशातल्या अमेठीत होणार आहे तीही मेक इन इंडियाच्या मिशन अंतर्गत. आजची डील झाल्यानंतर पुढच्या दहा वर्षासाठी भारतीय सशस्त्र दलांसाठी AK-203S मॉडेलची 6,014,427 रायफल्स निर्मिती केली जाईल. यातले पहिल्या 70 हजार रायफल्स ह्या रशियातच तयार केल्या जातील. ती कशी बनते, काय काय खबरदारी घ्यायची असते, म्हणजेच निर्मितीच्या सगळ्या अटी पूर्ण केल्यानंतर तिचं भारतात उत्पादन सुरु होईल. त्यासाठी 32 महिन्यांचा कालावधी ठरवण्यात आलाय. त्यानंतर मात्र भारतीय जवानांच्या हातात हे नवं शस्त्र दिलं जाईल.

    एस-400 मिसाईल डिफेन्स सिस्टीम

    पुतीन यांची कोरोना काळानंतरची ही पहिली विदेश दौरा आहे. त्यासाठी त्यांनी भारताला निवडलं यावरुन तिचं किती महत्व आहे याचा अंदाज येतो अशी प्रतिक्रिया रशियन राजदूतांनी दिलीय. गेल्या काही काळात पाक आणि चीन विशेषत: चीनकडून सीमावर्ती भागात ज्या कुरापती वाढल्यात, त्यावरुन धोका निर्माण झालाय. चीन काही ठिकाणी हल्ला करण्याची योजना करतोय असा जाणकारांचा अंदाज आहे. त्याला उत्तर देण्यासाठीच भारतानं रशियाकडून एस-400 (S-400 Defense Missile) ही मिसाईल डिफेन्स सिस्टीम खरेदी करण्याचा निश्चय केलाय. त्यावरच आज शिक्कामोर्तब होईल. ही डिफेन्स सिस्टीम आल्यानंतर भारतीय आकाशाला कवचकुंडलं मिळतील. कारण कुठल्याही क्षमतेचे मिसाईल हाणून पाडण्याची क्षमता ह्या डिफेन्स सिस्टीममध्ये आहे. ही सिस्टीम एवढी मजबूत मानली जातेय की त्यावर अमेरीकेनं आक्षेप घेतलाय. काही निर्बंध लादण्याचीही अप्रत्यक्ष घोषणा केलीय पण भारतानं असे कुठलेही इशारे सहन करणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

    MODI-PUTIN MEET : Russian President Putin in India today! AK-203 rifles-defense system deal to be made; Putin’s first visit in 06 months

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के