वृत्तसंस्था
नवी दिल्ली /वाराणसी : माग पौर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संत रविदास यांच्या दर्शनाने आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात केली. संत रविदास जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नवी दिल्ली आणि वाराणसी मध्ये संत रविदास यांच्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतले. Modi on the occasion of Sant Ravidas Jayanti – Darshan and Shabad Kirtan from Yogi, participation in langar !!
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळीच नवी दिल्लीतील करोलबाग मध्ये संत रविदास मंदिरात पोहोचले. त्यांनी तेथे संत रविदास यांचे दर्शन घेतले आणि मंदिरात महिलांसमवेत शबद कीर्तनामध्ये सहभाग घेतला. त्याचा व्हिडिओ पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटर हॅण्डल वरून शेअर केला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाराणसी मध्ये संत रविदास मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि लंगर मध्ये प्रसाद ग्रहण केले. माघ पौर्णिमेनिमित्त पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांनी आपल्या दिवसाची सुरुवात संत रविदास यांच्या दर्शनाने केली. उत्तर प्रदेश, पंजाब मध्ये विधानसभा निवडणूक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या या दोन महत्त्वाच्या नेत्यांनी संत रविदास दर्शनाच्या निमित्ताने दलित मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
Modi on the occasion of Sant Ravidas Jayanti – Darshan and Shabad Kirtan from Yogi, participation in langar !!
महत्त्वाच्या बातम्या
- मला जोड्याने मारणार म्हणता, 19 बंगल्यांचा मालमत्ता कर “कोणी” भरला? त्यांना काय करणार?? किरीट सोमय्यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर!!
- अक्षयकुमार गँगस्टरच्या भूमिकेत; बच्चन पांडे चित्रपटात भयानक लूकमध्ये दिसणार प्रेक्षकांना
- Towards a Resilient Planet : TERI जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद्घाटनपर भाषण
- दिव्यांगत्वावर मात करून दोन मित्र आत्मनिर्भर : कुणापुढेही हात न पसरता थाटला व्यवसाय